बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास बँक करू शकते मोठं नुकसान, जाणून घ्या नेमकं काय? | Bank Loan

आजकाल महागाई प्रचंड वाढली आहे. महागाईच्या या काळात नोकरदार त्यांचा पगार पुरेनासा होत आहे. एखादं स्वप्न पूर्ण करायचं म्हणलं तरी पैसा हातात उरत नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात कर्जाची (Loan) गरज भासते. घर, गाडी अशा मोठ्या वस्तू वस्तूंच्या गरजा भागवण्यासाठी चांगल्या रकमेची गरज असते म्हणूनच लवकर कर्ज घेण्याचा मार्ग स्वीकारतात. मग तो कर्जाचा हप्ता तुमच्या पगारातून दर महिन्याला वजा करण्यात येतो. परंतु अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, तुमच्याकडे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसतात. तसेच वारंवार कर्जाचा हप्ता तुमच्याकडून भरला जात नाही. अशा परिस्थितीत तुमचे काय नुकसान होऊ शकते किंवा बँक काय करते? याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

Bank Loan is not paid
Bank Loan is not paid

बँक कर्ज कसे देते? 

सर्वप्रथम पाहूयात बँक तुम्हाला कर्ज कसे देते. बँक तुमची तुमचा पगार पाहते. तसेच तुमचा सिबिल स्कोर काय आहे याची पडताळणी करते. तुम्हाला कर्जाची रक्कम किती हवी आहे तसेच तुम्ही तुमच्या पगारातून कर्जाची रक्कम किती चुकते करू शकता याचा अंदाज घेते. तसेच यापूर्वी तुम्ही कुठे लोन घेतले आहे का? हेही तपासते. याद्वारे तुमचा मागील रेकॉर्ड काय आहे? हे पाहते. यानंतर तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही ते बँक ठरवते. तसेच बँकेने विचारलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील तुम्हाला करावी लागते. अशाप्रकारे बँक तुम्हाला कर्ज देते. पण बँकेच्या कर्जाची परतफेड न केल्यास तुम्हाला बँकेच्या काही नियमांना सामोरे जावे लागते. 

कर्जाचा हप्ता न भरल्यास बँक रिमाइंडर लेटर पाठवते 

बँकेकडून कर्जासाठी तुमच्या माहितीची सर्व पडताळणी केली जाते यानंतर तुम्हाला बँक कर्जही देते. तुम्हीही कर्जाचा हप्ता भरण्याचं सर्व काही मॅनेजमेंट करता. परंतु अशी वेळ येते की कर्जाचा हप्ता भरणे शक्य होत नाही. अशावेळी बँक तुम्हाला सर्वप्रथम रिमाइंडर लेटर पाठवते. या रिमाइंडर लेटर मधून तुम्ही बँकेच्या कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून नोटीस पाठवते. तसेच तुमच्याकडून गृह कर्जाचे सलग तीन हप्ते चुकल्यास बँक तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवते. तुम्हाला सूचना केल्यानंतर देखील तुम्ही कर्जाचे हप्ते चुकवले नाही तर बँक तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषित करते. 

क्रेडिट स्कोअरवर परिणाम 

तुम्ही वारंवार कर्जाचे हप्ते थकवल्यास त्याचा परिणाम थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. क्रेडिट स्कोअरवर परिणाम झाल्यामुळे तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअरचा रेकॉर्ड खराब होतो. तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित सर्व बँका तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवतात. तसेच किती व्याजदराने तुम्हाला कर्ज द्यायचे हेही ठरवते. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी कर्जाचा हप्ता भरला नाही तर क्रेडिट स्कोअर खराब होऊन तुम्हाला पुन्हा करतो मिळणे अवघड होते. परिणामी तुम्हाला कठोर अटी व व्याजदर जास्त व्याजदराने कर्ज मिळू शकते.  

गहाण ठेवलेली मालमत्ता धोक्यात येते

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही मालमत्ता गहाण ठेवावी लागते. आता मालमत्ता कर्ज घेण्याच्या दृष्टीने तुम्ही गहाण ठेवता परंतु पुढे जाऊन कर्जाचा हप्ता थकवल्यास बँक तुमची घाण ठेवलेली मालमत्ता धोक्यात आणू शकते. गृह कर्ज घेण्यासाठी अनेकदा लोक मालमत्तेची कागदपत्रे गहाण ठेवतात. त्यामुळे कर्जाची परतफेड होईपर्यंत त्या मालमत्तेची कागदपत्रे बँकेकडेच राहतात. जर एखादी व्यक्ती आपल्या कर्जाची रक्कम परत करू शकली नाही तर गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे कागदपत्रे बँकेकडे असल्यामुळे ती मालमत्ता विकून कर्जाची परतफेड करण्याचा अधिकार बँकेला असतो. त्यामुळे तुम्ही गहाण ठेवलेली मालमत्ता धोक्यात येऊ शकते. 

बँक मालमत्तेचा लिलाव करते

खरंतर कर्जदाराला कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडून बराच कालावधी दिला जातो. परंतु त्या वेळेतही कर्जाची परतफेड न केल्यास मात्र बँक कठोर निर्णय घेते. त्यामुळे कर्जाची परतफेड करून शिकल्यामुळे बँक कर्जदाराला रिमाइंडर लेटर आणि कायदेशीर नोटीस पाठवते. यानंतरही कर्जदाराने कर्जाचे हप्ते चुकते नाही केले तर बँक थेट त्याच्या मालमत्तेवर ताबा घेते. मालमत्तेवर ताबा घेऊन बँक त्या मालमत्तेचा लिलाव करते. एकंदरीत बँक कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदाराला अनेक संधी देते परंतु तरीही कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँक कठोर निर्णय घेऊन मालमत्तेचा लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top