Dividend आणि Dividend Yield म्हणजे काय ?

Dividend – डिव्हीडंट देणे हे कंपनीसाठी काही कंपल्सरी नसते हे कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वर डिपेंड असते. जर का कुठली कंपनी कंटिन्यू देत असेल डिव्हीडंट तर ती पुढे सुद्धा देईल अशी गॅरंटी नाही. छोट्या कंपनी शक्यतो डिव्हिडंट देत नाहीत कारण ते त्यांचा प्रॉफिट हा त्यांच्या वाढीसाठी वापरतात.

Dividend in Marathi

कंपनीचे जे शेअर ट्रेड होत असतात ज्या किमतीवर ट्रेड होत असतात त्याला आपण मार्केट व्हॅल्यू म्हणतो जी रोज वर खाली होत असते आणि एक असते फेस व्हॅल्यू ती काही रोज बदलत नाही फेस व्हॅल्यू म्हणजे कंपनी जेव्हा त्यांचे शेअर्स इशू करते तेव्हा कंपनी डिसाईड करते त्यांची फेस व्हॅल्यू काय असेल. आणि रोज बदलली जात नाही ही फक्त स्टॉकस स्प्लिट किंवा कन्सोलिडेशन मध्ये चेंज होते. 

कंपनी जेव्हा देते डिव्हीडंट तेव्हा तो डिव्हीडंट फेस व्हॅल्यू वर देते.

म्हणजे एका उदाहरणाने आपण समजून घेऊया

ABC COMPANY SHARE PRICE – १००० रुपये

फेस व्हॅल्यू – १०

DIVIDEND २००%

तर DIVIDEND – २० रुपये

Dividend yield

डिव्हीडंट यिल्ड म्हणजे कंपनी त्यांच्या मार्केट प्राइस च्या किती पर्सेंट देत आहे याची टक्केवारी म्हणजे डिव्हीडंट यिल्ड 

हे कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्मुला हा आहे

(Dividend/Share) ÷ (Market Price/ Share)

याला सुद्धा आपण एका एक्झाम्पल समजून घेऊया की डिव्हीडंट यिल्ड का महत्वाचा आहे

कंपनी xyz ने rs २०/share dividend दिला ज्यांची शेअर किंमत १०००

कंपनी abc ने rs २०/share dividend दिला ज्यांची शेअर किंमत २०००

मग जास्त कोणी दिला ?

कंपनी xyz २०/१००० = २%

कंपनी abc २०/२००० = १%

कंपनी xyz ने जास्त dividend दिला.

पण जसा पण आता बघितलं की डिव्हीडंट यिल्ड हा कंपनीचा प्राईस वर डिपेंड असतो म्हणून याची टक्केवारी आपल्याला कमी जास्त दिसू शकते.

अशा काही कंपन्या ज्यांचा Dividend Yield हा जास्त आहे कंपन्यांचे मार्केट साईज सुद्धा जास्त आहे आणि कंपन्यांचा बिझनेस सुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे तर चला जाणून घेऊया असे कोणते स्टॉक्स आहे ज्यांचा Dividend Yield बऱ्यापैकी चांगला आहे

COAL INDIA ( Price : ४३४) : Dividend Yield ५.५९
या कंपनीचे जास्त करून ग्राहक हे पावर आणि स्टील सेक्टर मधले आहेत त्याचबरोबर सिमेंट फर्टीलायझर्स यामध्ये सुद्धा आहेत. ही कंपनी सिंगल लार्जेस्ट COAL प्रोड्यूस करणारी कंपनी आहे जगामध्ये.

Vedanta Limited (Price : २७२) : Dividend Yield ३७.४
वेदांत कंपनी मिनरल्स ओईल आणि गॅस मध्ये प्रोसेसिंग करण्यामध्ये कार्यरत आहे.प्रोडक्शन आणि सेल सुद्धा करते झिंक, लीड, सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम याचे.
कंपनी पावर जनरेशन, स्टील मॅन्युफॅक्चरिंग, पोर्ट ऑपरेशन सुद्धा बघते.

IOCL (PRICE: १६८) : Dividend Yield ३%
कंपनी हायड्रोकार्बन व्हॅल्यू चेन मध्ये कार्यरत आहे रिफायनिंग पाईपलाईन ट्रान्सपोर्टेशन आणि पेट्रोलियम चे मार्केटिंग ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट या सर्व प्रोसेस मध्ये ही कंपनी कार्यरत आहे आणि ऑइल रिफायनिंग आणि पेट्रोलियम मार्केटिंग सेक्टर मध्ये यांची लीडरशिप आहे.

HCL TECHNOLOGIES (PRICE :१५००) : DIVIDEND YIELD ३.३७

ही कंपनी आयटी सर्विसेस मध्ये कार्यरत आहे आणि टॉप फाय कंपनी मध्ये ही कंपनी येते कंपनी आयटी सोल्युशन्स प्रोव्हाइड करते
रिमोट इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट इंजीनियरिंग त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुद्धा प्रोव्हाइड करते.

NMDC (PRICE : २०२) : DIVIDEND YIELD ३.२७
ही कंपनी आयरन ओर डायमंड स्पॉन्ज आयरन चे प्रोडक्शन आणि विक्री मध्ये कार्यरत आहे त्याचबरोबर विंड पॉवरच्या विक्रीमध्ये सुद्धा कार्यरत आहे
कंपनी सगळ्यात मोठी मॅन्युफॅक्चरर आहे आयरन ओर ची जिच्याकडे 18% टोटल डोमेस्टिक प्रोडक्शनचा वाटा आहे.

Read More – Share Market

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top