पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार मोफत आरोग्य सेवा | White Ration Card

भारतात ज्या राज्यांमध्ये पांढरे रेशनकार्ड धारक आहे म्हणजेच वार्षिक उत्पन्न ज्यांते 1 लाखाहून जास्त आहे अशांना मोफत आरोग्य सेवा अनुभवता येणार आहो. याबद्दल अधिक माहिती मिळवूया या लेखाच्या माध्यमातून.

White Ration Card
White Ration Card

पांढरे रेशन कार्ड कोणासाठी

महाराष्ट्र राज्य अन्न व पुरवठा विभागनुसार संपुर्ण राज्यात तीन प्रकारचे रेशनकार्ड वितरीत करण्यात आले आहेत. हे रेशनकार्ड कुटुंबांच्या आर्थिक स्थिती पडताळून वितरीत करण्यात आलेले आहेत. पिवळे, केशरी आणि पांढरे असे हे रेशनकार्ड असून ते कशापद्धतीने वितरीत करण्यात आले आहेत ते आपण समजून घेऊ.

·        ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 15 हजार रुपयांपर्यंत असते त्यांना बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी म्हटले जाते. त्यांच्यासाठी पिवळे रेशनकार्ड देण्यात येते.

·        केशरी रेशन कार्ड लाभार्थांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 15 हजार पेक्षा जास्त, पण एक लाखपेक्षा कमी असते. यांना APL म्हणजे दारिद्र्य रेषेवरील लाभार्थी असे म्हटले जाते.

·        ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख आहे अशा कुटुंबाला पांढरे रेशन कार्ड देण्यात येतं

याआधी मोफत धान्य असे किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो या पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना कोणताही शासकीय फायदा मिळत नसे परंतू शासनाने आत घोषित केले आहे की या पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेबद्दल अधिक माहिती पुढे

5 लाखापर्यंत होणार उपचार

महात्मा फुले जन आरोग्य योजना ही लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत करुन घेण्याची संधी देते. शासनाने ठरवून दिलेल्या शासकीय दवाखान्यात हे मोफत उपचार होऊ शकतात. यासाठी केवळ लाभार्थ्यांकडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संबंधीत आयुष्यमान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. या आयुष्यमान भारत कार्ड लाभार्थ्यांची यादी शासनाने जाहीर केलेली आहे. ती पडताळून शासकीय सेवा कार्यालयांमध्ये जाऊन तुम्ही तुमचे आयुष्यमान भारत कार्ड तयार करुन घेणे आवश्यक आहे. या कार्डनुसार कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून 5 लाखापर्यंत उपचार मोफत होतात. पुढील यादीतील आजारांचे उपचार मोफत करुन दिले जातात.

·        सर्वसाधारण शस्त्रक्रिया

·        काम, नाक घसा शस्त्रक्रिया

·        नेत्ररोग शस्त्रक्रिया

·        स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र

·        अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया

·        पोठ व जठार शस्त्रक्रिया 

·        बालरोग शस्त्रक्रिया

·        प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया

·        मज्जातंतूविकृती शास्त्र

·        कर्करोग शस्त्रक्रिया

·        वैद्यकीय कर्करोग उपचार

·        रेडीओथेरपी कर्करोग

·        त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया

·        जळीत

·        पॉलिट्रामा

·        प्रोस्थेसिस

·        जोखिमी देखभाल

·        जनरल मेडिसिन

·        बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन

·        हृदयरोग

·        नेफ्रोलोजी

·        न्युरोलोजी

·        पल्मोनोलोजी

·        चर्मरोग चिकित्सा

·        रोमेटोलोजी

·        इंडोक्रायनोलोजी

·        मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी

·        इंटरवेन्शनल रेडीओलोजी

·        कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी

·        संसर्गजन्य रोग —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top