
बरेचदा एखाद्या शहारात किंवा ग्रामिण भागात स्वतःचे घर नसणाऱ्यांना भाड्याने घर घेऊन रहावे लागते. अशावेळी अनेकदा भाडेकरु आणि घरमालकांमध्ये खडाजंगी होताना दिसते. मग अशावेळी अनेकदा न्यायालयाला हा वाद संपवावा लागतो असाच एक भाडेकरु आणि घरमालकांच्या वादात सुप्रिम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय जाहिर केला आहे. मग नक्की कोणता आहे हा निर्णय आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.
Tenant Rules
करार संपला तरी भाडेकरुंनी घर खाली न केल्यास पडणार महागात
घरमालक आणि भाडेकरुंमध्ये भाडेकरार केला जातो. भाडेकरु किती दिवस घरात राहणार आणि त्याचे किती पैसे तो घरमालकाला देणार या सर्व गोष्टी त्या करारात नमूद केलेल्या असतात. परंतु अनेकदा खाजगी कारणांमुळे भाडेकरु करार संपून देखील घरातच राहत असतात.
अशावेळी करार संपल्यानंतर भाडेकरु घरात राहत असतील तर त्याची नुकसान भरपाई घरमालकाल भाडेकरुंनी देणे बंधनकारक असल्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने जाहीर केला आहे. त्यामुळे तुम्ही असे भाडेकरु असाल जे करार संपून देखील जास्तीचे दिवस घरमालकाच्या घरात राहत आहात तर ते नियम बाह्य आहे आणि त्याचा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
घरमालकाला नुकसान भरपाईचा अधिकार
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 अंतर्गत घरमालक आणि भाडेकरु यांच्यासाठी काही कायदे बनविण्यात आले आहेत. आता या कायद्यांमध्ये बदल करीत सुप्रिम कोर्टाच्या नवीन निर्णयानुसार घरमालकाला नुकसान भरपाई मिळविण्याचा अधिकार असेल.
भाडेकरु आणि घरमालकामधील करार संपल्यानंतर भाडेकरु जर का घरात राहत असतील तर त्यांनी घरमालकाला नुकसान भरपाई देणे कायद्यांतर्गत असणार आहे. तसे न केल्यास भाडेकरुंवर घरमालक पोलीस केस देखील करु शकतो.