अनेकदा जमीन खरेदी करताना घाईने व्यवहार केले जातात आणि जमिनीसंबंधीत कागदपत्रांची योग्य ती तपासणी न केल्याने फसवले जाण्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशी काही माहिती घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही जमिनीचा व्यवहार करताना फसले जाणार नाही. हा लेख पूर्ण वाचा आणि त्याप्रमाणेच जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करा.
Land Purchase Checklist
आपल्या जमिनीपर्यंत जाणारा रस्ता आहे का तपासा
तुम्ही जी जमीन खरेदी करण्याचा विचार करीत आहात तेथपर्यंत रस्ता आहे का या गोष्टीची सर्वप्रथम खात्री करुन घ्या. कारण रस्ता नसल्यास तुम्हाला कालांतराने जास्तीचे पैसे खर्च करुन रस्ता करावा लागेल. त्यामुळे जमीन खरेदी करण्याआधीच तेथपर्यंत रस्ता असल्याचे तपासा आणि मगच जमीन खरेदी करा. Land purchase idea
भूधारणा पद्धत तपासा
संबंधित जमिनीच्या सातबारावर भोगवाटदार वर्ग 1 किंवा भोगवाटदार वर्ग 2 यापैकी एक पर्याय असेल. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की, भोगवाटदार वर्ग 2 असे नमूद केलेल्या जमिनीवर सरकारच्या परवानगीशिवाय त्या जमिनीची विक्री करता येत नाही., आशा जमिनी देवस्थान, भूमिहीन शेतकरी यांना वाटप केलेल्या असतात.
जमिनीचा सातबारा आणि फेरफार तपासा
जमीन खरेदी करताना जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा तलाठ्याकडून काढून तपासून घ्या. तसेच तलाठ्याकडून जमिनीचा 8 अ उतारा देखील काढून तपासा. Land purchase idea
जमिनीवर न्यायालयीन कारवाई नसल्याचे तपासा
तुम्ही खरेदी करीत असलेल्या जमिनीवर कोणतीही न्यायलयीन कारवाई किंवा कौटुंबिक वाद तर नाहीत ना याची संपूर्ण शहानिशा करा आणिम मगच जमीन खरेदी करा.
खरेदी खत
जमिनीसंबंधीत सर्व माहिती मिळविल्या नंतर आणि ही माहिती बरोबर आहे हे तपासल्या नंतरच जमीन खरेदी करा, जमिनीचा संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खरेदी खत काढता येते. तुमच्या नावावर जमीन करण्यासाठी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कागदपत्रांची पूर्तता करुन आवश्यक शुल्क भरा आणि तुमचे जमीन खरेदीचे खरेदी खत तयार करुन घ्या. या खरेदी खतामध्ये गट क्रमांक, मूळ मालकाचे नाव, खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव, चतुःसीमा, क्षेत्र तपासणी या सर्वा गोष्टींची माहिती देण्यात आलेली असते. Land purchase idea