हे 15 कार्ड काढले तर मिळतील सर्व योजनांचे लाभ! 

भारत सरकारचे हे 15 कार्ड काढले  तर सर्व योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. आणि हे कार्ड काढण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. हे कार्ड आपण सहजपणे काढू शकतो. तर ते कार्ड कोणकोणते आहेत हे पाहू :-

1) आयुष्मान कार्ड – हे कार्ड काढल्यानंतर आपण खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतो. हे कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने काढू शकतो.

2)ABHA Health ID card – ABHA म्हणजेच Ayushyaman Bharat Health account . या कार्डमध्ये रुग्णाची सर्व माहिती असते. रुग्णाच्या आजाराचा पूर्व इतिहास म्हणजेच त्याला कोणता आजार आहे  इत्यादी माहिती समाविष्ट असते. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर आपण हे कार्ड दाखिवल्यावर तुमच्या आजाराबद्दल डॉक्टरला पूर्ण माहिती मिळेल. कोणता आजार आहे, कोणते उपचार चालू आहेत याची सर्व माहिती मिळते. हे कार्ड ऑनलाइन बनवू शकतो.

3) ई श्रम कार्ड – श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सन 2020 मध्ये असंघटित क्षेत्रातील श्रमिकांसाठी ई श्रम पोर्टल केले होते. विश्राम पोर्टल 30 व्यापक व्यवसाय क्षेत्रांसाठी आणि 400 व्यवसायांसाठी सुविधा प्रदान करते. या कार्डद्वारे मजुरांना साठ वर्षानंतर पे, मृत्यू विमा, अक्षम स्थितीमध्ये वित्तीय सहाय्यता यांसारखे लाभ मिळू शकतात. हे कार्ड फक्त आधार कार्डच्या माध्यमातून बनवू शकतो.

4) मानधन योजना कार्ड –  हे योजना कार्ड बनवले तर साठ वर्षानंतर तीन हजाराचे मासिक पेन्शन मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये चे योगदान करावे लागेल. या योजनेमध्ये 50% लाभार्थी आणि 50 टक्के सरकारचे योगदान असते.

5) लेबर कार्ड – जर तुम्ही बेरोजगार असाल तरी कार्ड काढल्यानंतर तुम्हाला सरकारद्वारे रोजगार दिला जातो. या कार्ड काढण्याच्या वेळी दुर्घटना विमा सुद्धा काढला जातो दुर्घटनेच्या वेळी जर मृत्यू झाला तर सरकार एक लाख पर्यंत सहाय्यता करतो आणि सामान्य मृत्यू झाला तर तीस हजार पर्यंत मदत मिळते.

6)NCS Card – या कार्ड मध्ये तुमची माहिती Resume type मध्ये असते. या कार्डद्वारे सहजपणे नोकरीसाठी आवेदन करू शकतो व याद्वारे सहजपणे नोकरी मिळू शकते.

7) जीवन ज्योती विमा कार्ड – कार्ड बनवले तर समजा की तुमचे विमा कार्ड बनलेले आहे. जर तुमची कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर तुम्हाला दोन लाख पर्यंत जीवन सुरक्षा कवच मिळते.

8) वोटर आयडी कार्ड – हे एक प्रकारचे आयडी कार्ड सुद्धा आहे. हे कार्ड आपण डॉक्युमेंट साठी कुठेही वापर करू शकतो. मतदान करण्यासाठी हे कार्ड खूप महत्त्वाचे आहे. हे कार्ड ऑनलाइन काढू शकतो आणि ऑनलाइन प्राप्त करू शकतो.

9) आधार कार्ड – आपल्या सर्वांना माहीतच आहे की आधार कार्ड किती महत्त्वाचे आहेत.सर्व ठिकाणी आपल्याला आधार कार्ड मागितले जाते. हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने काढू शकतो.परंतु फोटो काढण्यासाठी व बायोमेट्रीकसाठी आधार सेंटरवर जावे लागते.

10)पॅन कार्ड – जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा बँक अकाउंट ओपन करायचे असेल, तर पॅन कार्ड खूप महत्त्वाची आहे. जर आपण ऑनलाईन earning करत असाल आणि पैसे डॉलर मध्ये येत असतील तर इंडियन रुपयांमध्ये रूपांतरित करण्यासाठी पॅन कार्ड खूप गरजेचे असते.

11) जॉब कार्ड – यालाच मनरेगा जॉब कार्ड सुद्धा म्हटले जाते. या कार्डद्वारे सरकारच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होतो. हे कार्ड गाव किंवा मागासलेल्या ठिकाणी जास्त करून बनवले जाते. हे कार्ड बनवण्याचा फायदा आहे की तुम्हाला प्रत्येक दिवशी रोजगार मिळतो. कार्ड जास्त करून ऑफलाईन पद्धतीने काढले जाते.काही राज्यात ऑनलाइन पद्धतीने काढण्याची सोय आहे.

12) ई संजीवनी ओपीडी कार्ड – हे कार्ड काढण्याचा उद्देश म्हणजे जर तुम्हाला काही आरोग्याविषयी त्रास होत असेल आणि तुम्ही डॉक्टरांजवळ जाऊ शकत नसाल तर या कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

13)MY GOV CARD – हे कार्ड काढण्याचा उद्देश म्हणजे सरकारद्वारे ज्या योजना येतील, त्या योजनांची माहिती तुम्हाला मेसेज द्वारे मिळेल. यामुळे तुम्ही सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता.

14) रेशन कार्ड – आपल्या सर्वांना माहीतच आहे की, या कार्डद्वारे महिन्याला गहू, तांदूळ, साखर, तेल इत्यादी आपल्याला कमी पैशात मिळतात. काही राज्यात या गोष्टी मोफतसुद्धा मिळतात. हे कार्ड आपण ऑनलाइनसुद्धा काढू शकतो.

15)Kisan credit card – जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेती करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी सहजपणे कर्ज  मिळू शकते. हे एक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहे आणि जेव्हा कर्ज परतफेड कराल, त्यावर तुम्हाला कोणतेही व्याज आकारण्यात येत नाही. त्यामुळे हे कार्ड खूप महत्त्वाचे ठरू शकते

या प्रकारे तुम्ही हे 15 कार्ड काढून काढले तर वेगवेगळ्या प्रकारचे आणि योजनांचे लाभ घेऊ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top