कृषी सेवा केंद्र कसे सुरू करावे ? जाणून घ्या

बीएससी ऍग्री ला ऍडमिशन घेणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची इच्छा असते की, स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू करावे. तर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी काय करावे लागते. यामध्ये बराच गोंधळ होत असतो. ज्यांना अजून माहिती नाही की,कृषी सेवा केंद्र म्हणजे नेमकं काय असतं?हे केंद्र कोण सुरू करू शकतो? याची प्रोसेस काय असते? हे केंद्र टाकण्यासाठी शिक्षण काय असते? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत. प्रथम आपण जाणून घेऊया की, कृषी सेवा केंद्र म्हणजे नेमकं काय?

Krushi Seva Kendra
Krushi Seva Kendra

कृषी सेवा केंद्र

शेतकऱ्याला शेती करताना अवजाराची, खताची, बी बियाणं यांची गरज पडते तर शेतकरी या सर्व वस्तू ज्या ठिकाणावरून किंवा ज्या दुकानातून खरेदी करतो त्या दुकानालाच कृषी सेवा केंद्र असे म्हटले जाते. तर मग हे कृषी सेवा केंद्र कोण टाकू शकतो आणि कृषी सेवा केंद्र टाकण्याची प्रक्रिया काय असते हे आपण जाणून घेऊया .

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

शैक्षणिक पात्रता

1) Bsc. Agriculture
2) Agri. Diploma
3) Bsc ( Horticulture)
4) B.Tech ( Agri. Engineering)
5) B.Tech ( Agri. Biotechnology)
6) Bsc (ABM)
7) Bsc. Chemistry/Botony/Zoology
या सात पैकी तुम्हाला कोणतीतरी एक डिग्री पूर्ण करणे अनिवार्य आहे. कृषी सेवा केंद्र टाकण्यासाठी Licence ची आवश्यकता असते हे Licence तीन प्रकारात मोडले जाते
1) Pesticides Licence
2) Fertilizer Licence
3) Seed Licence

कागदपत्रे

1)आधार कार्ड, वोटर आयडी किंवा पॅन कार्ड या तिन्ही पैकी कोणत्याही एकाची गरज तुम्हाला आयडेंटी प्रुफ म्हणून लागते .
2)बँक पासबुक- ज्याच्या नावावर कृषी सेवा केंद्र सुरू करायचा आहे,त्याची बँक पासबुकची झेरॉक्स लागते. 3)रेशन कार्ड
4)इलेक्ट्रिसिटी बिल- ज्या तारखेला Licence साठी Apply करणार आहात, त्या तारखेच्या मागील तीन महिन्याचे बिल तुम्हाला झेरॉक्सच्या स्वरूपात द्यावे लागेल.
5)डिग्री सर्टिफिकेट
6)लिविंग सर्टिफिकेट – ज्या कॉलेजमधून तुम्ही तुमची डिग्री पूर्ण केली ते कॉलेज सोडल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागेल.
ही झाली बेसिक डॉक्युमेंटबद्दलची माहिती. आता आपण इतर डॉक्युमेंट काय काय लागतात, याची माहिती घेऊया.
1)NOC – म्हणजेच न हरकत प्रमाणपत्र. हे तुम्हाला ग्रामपंचायत म्हणून काढावे लागेल.
2) ग्रामपंचायत नमुना नंबर 8 – म्हणजे ज्या जागेत कृषी सेवा केंद्र तुम्ही टाकणार असाल, त्या जागेचा ग्रामपंचायत नमुना नंबर 8 लागेल.
3)पत्रक 4 – कृषी सेवा केंद्र ची जागा ही भाड्याची असेल तर शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर agreement लागेल.कृषी अधिकारी तिथे येऊन त्या जागेची तपासणी करतात.त्याला ॲग्रीमेंटल पत्रक ४ असं म्हटलं जातं.
4) प्रिन्सिपल सर्टिफिकेट – प्रिन्सिपल सर्टिफिकेट म्हणजे ज्या कंपनीचे तुम्ही प्रॉडक्ट विकणार आहात त्या कंपनीतून काही सर्टिफिकेट दिले जातात. एजंट किंवा होलसेलर यांच्याकडून प्राप्त होते, या सर्टिफिकेटला प्रिन्सिपल सर्टिफिकेट असे म्हटले जाते.

आता  आपण बघणार आहोत की licence मिळवण्याची प्रक्रिया काय आहे? licence मिळवण्यासाठी काय करावे लागते?

स्टेप 1 -सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म भरावा लागतो. wwe.eparwana.com या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे.
स्टेप 2 – या फॉर्मची एक मुख्य प्रत आणि वर सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंटची झेरॉक्स जोडून त्याची फाईल तयार करायची आणि कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहे.
स्टेप 3 – कृषी अधिकारी ही फाईल तपासतील आणि तुम्ही कृषी सेवा केंद्र टाकण्याच्या योग्य आहात की नाही हे तपासल्यानंतर तुम्हाला licence मिळेल.
हे licence मिळवण्याची प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी जवळपास 29 ते 30 दिवस लागतात.  थोडक्यात एक महिना लागतो.

 Licence मिळवण्यासाठी किती फी आकारली जाते

1)Pesticides Licence – 7500 RS

2) Seed Licence – 1250 RS

3) Fertilizer Licence – 450 RS

licence मिळाल्यानंतर तुम्हाला कृषी सेवा केंद्रासाठी एक लोकेशन निवडावे लागते.लोकेशन निवडताना पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांना म्हणजे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना येण्याजाण्याच्या दृष्टीने सोयीचा पडेल असे ठिकाण निवडावे.आपला  पुढचा मुद्दा आहे की कृषी सेवा केंद्र टाकण्यासाठी येणारा खर्च – साधारणपणे गाव पातळीवर विचार केल्यास कृषी सेवा केंद्र चालू करण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये इतका खर्च लागतो. विभागाच्या दृष्टीने या खर्चात कमी जास्त होऊ शकतो.

नफा/मार्जिन

1) Branded Company Pesticides :- 4%-5% 

2) Local Company Pesticides :- 15%-20%

3) Fertilizer :- 1% -2% 

4) Seed :- 16%-20%

तर या सर्वांचा विचार केला असता, लोकल कंपनीमध्ये पेस्टिसाइड यामध्ये तुम्हाला जास्त नफा होतो.


            तर ही होती कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची  संपूर्ण प्रक्रिया. वरील सर्व माहिती समजली असेल अशी आशा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top