साठेखत म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? साठेखत करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? | Sathekhat

एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द हमखास कानावर पडतो तो म्हणजे साठेखत. याला इंग्रजीमध्ये Agreement of sale असे म्हणतात. साठेखत म्हणजे काय आहे आणि नोंदणीकृत साठेखत करून घेण्याची पद्धत काय आहे हे पाहू.

साठेखत म्हणजे काय
साठेखत म्हणजे काय

साठेखत

मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 54 नुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार असतो. म्हणजे काय भविष्यात जर तुम्हाला एखादी स्थावर मालमत्ता जी आहे ती विक्री करायची असेल तर त्यासाठीचा करार आताच केला जातो. दोन व्यक्तीमध्ये असणारा हा व्यवहार कसा असणार, हे यामध्ये नमूद करतात. त्याला साठेखत असे म्हणतात.

यालाच विसार वायदा पत्र किंवा वचननामा असे म्हणतात. केवळ साठेखत केल्यामुळे खरेदीदाराला मालकी हक्क प्राप्त होत नाही.  तर तो मालकी हक्क तेव्हाच प्राप्त होतो, ज्यावेळेस रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन त्या प्रॉपर्टीची खरेदी केली जाते आणि खरेदीदाराला त्याचे खरेदी पत्र मिळते.

साठेखत कुठे करतात?

साठेखत शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केला जाऊ शकतो पण  ते कायदेशीर पुरावा म्हणून ग्राहय धरले जात नाही. अशा साठेखताची शासकीय अभिलेखात नोंद होत नाही. तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन नोंद करू शकता यालाच यालाच रजिस्टर किंवा नोंदणीकृत साठेखत असे म्हणतात. ते कायदेशीरदृष्ट्या फायद्याचा असतं. हे साठेखत करताना तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागते.

नोंदणीकृत साठेखताचे फायदे

1)प्रत्यक्षात खरेदी करता त्या मालमत्तेची त्यावेळेस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागत नाही.
2) काही कारणास्तव व्यवहार रद्द झाला तर दुय्यम निबंधकाकडे रीतसर अर्ज करून मुद्रांक शुल्काची रक्कम परत मिळू शकता.

साठेखतात नमूद करायच्या बाबी

1) मालमत्ता विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तींची नावे,पत्ता, आधार क्रं, मोबाईल क्रं.
2) मालमत्तेचा तपशील म्हणजेच मालमत्तेचे ठिकाण, गट नंबर, क्षेत्रफळ, मालमत्तेच्या चारही बाजूला काय आहे याची माहिती.
3) खरेदीदार ठरलेली रक्कम कशा स्वरूपात आणि किती वेळात विक्रेत्याला देणार त्याचा तपशील.
4) साठेखत केल्याच्या दिनांकापासून ते कधीपर्यंत अमलात आणण्यात येईल याचा तपशील.
5) जर या मुदतीत खरेदी विक्री व्यवहार पूर्ण झाला नाही तर काय परिणाम होतील. हे सुद्धा नमूद करणे अपेक्षित असते.
6) साठेखत करताना काही रक्कम ऍडव्हान्स म्हणजे आगाऊ स्वरूपात दिली आहे का ती ऑनलाईन दिली की कॅश हेसुद्धा नमूद करावे .
7) कोणत्या कारणासाठी मालमत्ता विकणार आहे, मालमत्तेवर काही कर्ज आहे का? मालमत्तेची कोर्ट केस आहे का?याची माहिती.
8) जमीन विकणाऱ्या व्यक्तीकडे ही जमीन कशी आली म्हणजे तो जमिनीचा पूर्ण मालक आहे का ते पाहणे. यासाठी जमिनीच्या वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top