LIC Kanyadan Policy | तुम्ही जर मुलींचे पालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ज्याचं कारण म्हणजे मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आजचं काही ना काही केले तर त्यांना पुढचे दिवस चांगले जातील. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी वर्षाला पैसे कसे सुरक्षित ठेवावे याची माहिती जाणून घेऊयात. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी ‘एलआयसी कन्यादान योजना’ (LIC Kanyadan Policy) सुरू करण्यात आली आहे. ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या लग्नासाठी सुरू करण्यात आली आहे. मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक (Financial) चिंता कमी करणारी एलआयसीची ही योजना काय आहे? त्याचा लाभ कसा घ्यावा? याबाबतची सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात.
LIC कन्यादान योजना 2024 काय आहे?
एलआयसी कन्यादान योजनेचा उद्देश मुलींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या योजने मध्ये मुलींचे पालक आपल्या मुलीच्या उज्वल भवितव्यासाठी दररोज 121 रुपये जमा करतील. या 121 रुपयांमधून दर महिन्याला 3 हजार 600 रुपये साठतील. यातून मुलीच्या 25व्या वाढदिवसापर्यंत तब्बल 27 लाख रुपये जमा होतील. जे तिच्या उज्वल भविष्यासाठी कामी येतील. या पैशांमुळे पालकांचा मुलीच्या शिक्षणासाठी होणारा खर्च तसेच तिच्या लग्नासाठी लागणारा पैसा जमा होईल.
यामुळे पालकांवरचा देखील आर्थिक भार कमी होईल. एलआयसी कन्यादान योजनेमध्ये 13 ते 25 वर्षांचा कालावधी निवडता येतो. या कालावधीनुसार गुंतवणुकीची लवचिकता अवलंबून असते. उदा. जर दररोज 75 रुपये (रु. 2,250 मासिक) गुंतवून मुलीला 25 वर्षांनंतर 14 लाख रुपये मिळू शकतात. यानंतर आता एलआयसी कन्यादान योजनेचे निकष काय आहेत हे जाणून घेऊयात.
LIC कन्यादान पॉलिसी 2024 साठी पात्रता किंवा निकष
तुमच्या तुमच्या मुलीसाठी एलआयसी कन्यादान पॉलिसी सुरू करायची असेल तर तुम्हाला काही पात्रता किंवा निकष पूर्ण करणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या मुलीचे पालक मूळचे भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
तसेच अर्ज करणाऱ्या मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे.
तुम्ही जर हे दोन निकष पूर्ण केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता आपण या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतील याची माहिती पाहूयात.
LIC कन्यादान पॉलिसी 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
पालकांपैकी एकाचे ओळख प्रमाणपत्र/मतदार कार्ड.
मुलीचे आधार कार्ड
मुलीच्या बँक खात्याचे पासबुक
पॅन कार्ड
आय प्रमाण पत्र
पत्त्याचा पुरावा
जात प्रमाणपत्र
मुलीचे जन्म प्रमाणपत्र
मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
मुलीच्या पालकांचा सध्याचा मोबाईल नंबर
LIC कन्यादान पॉलिसी 2024 चे फायदे काय आहेत?
आता आपण एलआयसी कन्यादान पॉलिसीचे फायदे काय आहेत हे पाहुयात.
मृत्यू लाभ
जर या पॉलिसी दरम्यान विमाधारक व्यक्तीला म्हणजेच सदर मुलीला जर काही झाले तर तिच्या पालकांना आर्थिक मदत मिळते. मग ही रक्कम वार्षिक प्रेमी प्रीमियमच्या सातपट किंवा मूळ विमारतमेच्या 110 टक्के असू शकते. तसेच परिपक्वतेवर किंवा वार्षिक उत्पन्न म्हणून दिले जाते.
मॅच्युरिटी बेनिफिट
जर विमाधारकाने त्याची विम्याची मुदत पूर्ण केली असेल तर त्यांना बोनस मिळतो. त्याचबरोबर विम्याची मूळ रक्कमही मिळते.
खात्रीशीर संरक्षण
जर विमाधारकाच्या पालकांचा मृत्यू झाला तर पुढचे प्रीमियम माफ केले जातात. तसेच अपघाती निधन झाल्यास पॉलिसीकडून दहा लाख रुपये दिले जातात. नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबीयांनाला परिपक्व होईपर्यंत वार्षिक 5 लाख आणि 50,000 रुपये मिळतात.
दुहेरी फायदे
खरं तर या योजनेचे दुहेरी फायदे मिळतात. ते म्हणजे पॉलिसी विमा ह मिळतो आणि बचतही होते. अशा प्रकारचे दोन फायदे मिळतात. तसेच गंभीर घटनांमध्ये आर्थिक सहाय्य देखील मिळते.
लवचिक पेमेंट
विमाधारक व्यक्ती एकरकमी तसेच हप्त्यांमध्ये फायदे प्राप्त करणे निवडू शकते.
कर्ज
प्रीमियम किमान दोन वर्षांसाठी भरल्यास, पॉलिसी कर्जास परवानगी देते, आर्थिक बॅकअप देखील देते.
LIC कन्यादान पॉलिसी 2024 साठी अर्ज कसा करावा?
जवळच्या LIC शाखेला भेट द्या. जिथे त्यांचे तज्ञ तुम्हाला खरेदी प्रक्रियेत मदत करतील.
तुम्ही नोंदणीकृत तसेच परवानाधारक एलआयसी एजंटची मदत घेऊ शकता. ते नक्कीच तुम्हाला प्रक्रियेत मार्गदर्शन करू शकतात.