आता घरबसल्या मोबाईलवर एका मिनिटात बनवा ‘सीनियर सिटीजन कार्ड’, पाहा काय मिळतात फायदे? | Senior Citizen Card

केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील जेष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. आता केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीजन कार्ड’ बनवले आहे. ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक कार्ड असेही म्हणू शकतो. आता ‘सीनियर सिटीजन कार्ड’ (Senior Citizen Card) ज्येष्ठ नागरिकांसाठी कशासाठी बनवण्यात आले आहे? तसेच नागरिकांना याचा काय फायदा होईल? त्याचबरोबर हे कार्ड कसे काढावे? याबाबतची सविस्तर अशी माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

Senior Citizen Card
Senior Citizen Card

सीनियर सिटीजन कार्ड 

तर मित्रांनो सीनियर सिटीजन कार्ड हे 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आले आहे. आता तुम्ही म्हणाल याचा फायदा काय होतो बरं? खरं तर या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व गरजा पूर्ण करणे हा केंद्र शासनाचा मुख्य उद्देश आहे. ज्याचं कारण म्हणजे वय वाढल्यामुळे नागरिकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. याच कारणास्तव केंद्र शासनाने ‘सीनियर सिटीजन कार्ड’ सुरू केले आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील जेष्ठ व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सीनियर सिटीजन कार्ड काढावे लागेल. तर ‘सीनियर सिटीजन कार्ड’ ऑनलाइन पद्धतीने कसे काढता येईल याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊयात. ‘सीनियर सिटीजन कार्ड म्हणजे काय? What is ‘Senior Citizen Card’? 

सर्वप्रथम सीनियर सिटीजन कार्ड म्हणजे काय हे पाहूयात. तर देशातील वयाची साठ वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकाला सीनियर सिटीजन कार्ड काढता येईल. या कार्डमुळे सदर व्यक्तीची ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळख होईल. एकंदरीत हे कार्ड ओळखपत्र प्रमाणेच काम करेल. या कार्डवर सदर ज्येष्ठ नागरिकाचे नाव, पत्ता, जन्मतारीख, रक्तगट, संपर्क क्रमांक, वैद्यकीय तपशील इत्यादी माहिती असेल.    

सीनियर सिटीजन कार्ड चे फायदे काय आहेत?

‘सीनियर सिटीजन कार्ड’द्वारे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत दिली जाते. 

त्याचबरोबर या कार्डद्वारे ज्येष्ठ नागरिकांना विमान प्रवासाची तिकिटे देखील दिली जाणार आहेत. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

ज्येष्ठ नागरिकांना ‘सीनियर सिटीजन कार्ड’द्वारे शासकीय रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात. तसेच इतर खाजगी रुग्णालयात देखील उपचारात सवलत दिली जाते. 

इतकच नाही तर, या कार्डचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना एफडीवर देखील सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक व्याजदर मिळतो.  

त्यासह पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजनांसाठी देखील  ज्येष्ठ नागरिकांना इतर सामान्य नागरिकांपेक्षा अधिक लाभ दिला जातो. 

सीनियर सिटीजन कार्डद्वारे आयकर कमी भरावा लागतो. तसेच आयकर रिटर्न भरण्यात देखील सूट मिळतो.

या कार्डच्या माध्यमातून केंद्राच्या या सुविधांचा लाभ घेऊन  जेष्ठ नागरिक चांगले जीवन जगू शकतात. 

‘सीनियर सिटीजन कार्ड’साठी काय पात्रता हवी? What are the eligibility requirements for ‘Senior Citizen Card’? 

लाभ घेणारा नागरी भारतीय असणे आवश्यक आहे.

सदर उमेदवाराचे वय किमान ६० वर्षे असणे आवश्यक आहे.

त्यासह उमेदवाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.   

सीनियर सिटीजन कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत?

  • आधार कार्ड
  • आय प्रमाण पत्र
  • जात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • स्वतःचा फोटो
  • पॅन कार्ड
  • शिधापत्रिका
  • ई – मेल आयडी

सीनियर सिटीजन कार्ड ऑनलाइन पद्धतीने कसे काढावे? 

  • तुम्हाला जर सीनियर सिटीजन कार्ड घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढायचे असेल, तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 
  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://services.india.gov.in/service/detail/apply-for-senior-citizen-certificate-1 सीनियर सिटीजन कार्डच्या या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.  
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
  • यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
  • यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल.
  • तुम्हाला या अर्जात विचारलेली सर्व माहिती भरावी लागणार आहे.
  • यानंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे जोडावी लागतील.
  • ही सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून पाहिल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. 
  • अशा प्रकारे ऑनलाइन पद्धतीने सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सीनियर सिटीजन कार्ड सहज मिळवू शकता.  

Leave a comment