बँक खात्याचे प्रकार व त्याची संपूर्ण माहिती. जाणून घ्या

आपण बँकेत गेल्यावर आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात. बँक खाते कसे उघडायचे? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? त्याचे प्रकार काय असतात? कोणत्या कामासाठी कोणते खाते उपयोगी पडते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. बँकेमध्ये मात्र प्रश्नांची उत्तर देण्यासाठी कुणाकडे वेळ नसतो. म्हणूनच आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत.

Bank Account Types
Bank Account Types

1) Saving Account

सेविंग अकाउंट हे कोणीही उघडू शकते जसं की गृहिणी, विद्यार्थी, वृद्ध. आपण यामध्ये जर महिन्याला किंवा काही दिवसांच्या अंतराने सेविंग अकाउंट मध्ये पैसे भरू शकतो. आणि ते आपण कधीही बँकेतून काढू शकतो. बँक आपल्याला त्यावर मासिक, तिमाही किंवा वार्षिक स्वरूपात व्याज देते. हे व्याज प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असते.

2) Current Account

हा अकाउंट प्रकार व्यवसाय मालक आणि व्यापाऱ्यांसाठी आहे. अधिक संख्या आणि व्यवहाराची वारंवारता सुलभ करते, आणि दैनंदिन व्यवहारावर मर्यादा नसते. याशिवाय, या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते जी खातेदाराला खात्यात असणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची मुभा देते. परंतु, चालू खाते हे शून्य व्याज खाते आहे आणि त्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असते. हे अकाउंट व्यावसायिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे ठरते.

3) FD Account

Fixed diposit ज्याला FD म्हणून ओळखले जाते, खात्यात आपल्याला एकरकमी रक्कम जमा करता येते आणि त्यावर कालावधीप्रमाणे (जो सात दिवस ते दहा वर्षापेक्षा कमी असू शकते) विशिष्ठ व्याज दर आकारण्यात येतो.
ऑनलाईन बँकिंगने FD उघडण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन दिले आहे. आता आपण काही मिनिटातच FD उघडू शकता.

4) Recurring Account

यालाच RD म्हणतात, हा FD पेक्षा थोडासा वेगळा प्रकार आहे. FD मध्ये ठराविक रक्कम एकदाच जमा केली जाते आणि RD मध्ये आपण निवडलेल्या मुदतीप्रमाणे आपल्याला सहा महिने ते दहा वर्षापर्यंत मासिक किंवा त्रैमासिक काही ठराविक रक्कम जमा करावी लागते. या प्रकारच्या खात्यात कालावधी संपेपर्यंत खातेदारास ठराविक व्याजदराने व्याज दिले जाते.
RD आपल्याला कालावधी आणि आवर्ती रक्कम बदलण्याची परवानगी देत नाही. याशिवाय काही बँका कमी व्याजदारानुसार दंड आकारून RD अकाली बंद करण्याची परवानगी देतात.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

5) Salary Account

नावाप्रमाणेच, Salary Account म्हणजेच पगार खाते हे दरमहा आपला पगार या खात्यामध्ये जमा होतो. एखादया कंपनीचा कर्मचारी म्हणून आपण आपल्याला हव्या असलेल्या वैशिष्टांप्रमाणे पगाराचा प्रकार निवडू शकता. पगाराव्यतिरिक्त आपणास पगार खात्यामध्ये भरपाईसुद्धा मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top