रेशन कार्ड आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. कोणताही काम करायचं म्हटलं की रेशन कार्ड आपला पुरावा म्हणून देण्यात येते. त्याचबरोबर रेशन कार्डचा दुसराही फायदा आहे. तो म्हणजे या रेशन कार्डमुळेच आपल्याला स्वस्त अन्नधान्यही मिळते. आता केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांसाठी अंत्यदय योजना राबवण्याचा जनतेच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुढची पाच वर्षे नागरिकांना रेशन कार्डवर अन्नधान्य मोफत मिळणार आहे. हेच मिळणारे मोफत अन्नधान्य तुम्हाला पुढेही कायम सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची केवायसी करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला रेशन कार्डची केवायसी कशी करावी लागेल. Ration Card EKyc
सरकारी आदेशानुसार तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोफत अन्नधान्य मिळण्यास व्यत्यय येऊ येऊ शकते. केंद्र सरकार दारिद्र्यरेषाखालील नागरिकांना मोफत अन्नधान्य रेशन कार्डद्वारे पुरवते. नागरिकांना हे रेशन का धान्य सरकारी अनुदानावर मिळत आहे.
त्यामुळे नागरिकांना यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. आता सरकारने रेशन धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्डमधील सर्व व्यक्तींचे रेशन कार्डला आधार लिंक करायला सांगितले आहे. एक व्यक्ती दोन रेशन कार्डमधून अन्नधान्याचा लाभ घेत आहे.
त्यामुळे बनावट शिधाधारकांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे सरकारने आता केवायसी करणे अनिवार्य केले आहे. ज्या लोकांची केवायसी होईल अशाच लोकांना आता रेशन कार्ड वर अन्नधान्य मिळणार आहे. Ration Card EKyc
रेशन कार्ड आधार कार्डला लिंक कसे करावे?
तुम्हाला जर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करायचे असेल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (PDS) ya अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवर लॉगिन करावे लागणार आहे. जर तुमचे या वेबसाईटवर आधीपासून लॉगिन नसल्यास तुम्हाला तेथे नवीन लॉगिन करावे लागेल.
या वेबसाईटवर तुम्हाला लिंक आधार किंवा लिंक आधारित रेशन कार्ड असा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
यानंतर तुम्हाला तिथे तुमचा रेशन कार्ड नंबर आणि विचारलेली आवश्यक माहिती भरावी लागेल.
त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे आणि त्यांचा आधार कार्ड नंबर तेथे प्रविष्ट करावा लागेल.
तुम्हाला आधार कार्डची संलग्न असलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल.
यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तेथे ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला पडताळणी संदेश येईल आणि तुमचा अर्ज करण्यात येईल. Ration Card EKyc
gurunaththore@gmail.com tq Udgir dist Latur post malewadi