आता Mahindra XUV.e8 ला टक्कर द्यायला बाजारात येते टाटा कंपनीची Tata Harrier EV कार, पाहा जबरदस्त फीचर्स  

सध्या लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची झपाट्याने क्रेज निर्माण होत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता लोकांचा आता इलेक्ट्रिक वाहनांकडे कल मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांचा लोकांना अधिक फायदा होतो. एकीकडे प्रदूषणासाठी देखील इलेक्ट्रिक वाहने फायद्याची ठरतात. तर दुसरीकडे लोकांचा पेट्रोल आणि डिझेलचा खर्च देखील वाचतो. आता कंपन्या एकापेक्षा एक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी उत्तम इलेक्ट्रिक वाहन कोणते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग सविस्तरपणे या वाहनाची माहिती जाणून घेऊयात.

TATA Harrier EV
TATA Harrier EV

Tata Harrier EV येणार लवकरच बाजारात 

वर्षानुवर्षे ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी आणि विश्वासार्ह कंपनी म्हणजे टाटा. कारण बाईक किंवा कार खरेदी करायचं म्हटलं की सर्वात प्रथम डोळ्यासमोर कंपनी उभा राहते ती म्हणजे टाटा हीच. आता टाटा कंपनीची इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. टाटा कंपनीने आता मोठी आलिशान लक्झरी इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करणार आहे. टाटा कंपनीची Tata Harrier Electric Car ही इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार आहे. 

Tata Harrier EV फीचर्स काय आहेत?

सध्या बाजारात कारच्या स्पर्धा जोमात सुरू आहेत. अशातच आता Maruti eVX आणि Mahindra XUV.e8 कंपनीच्या हाय रेंज कारला इलेक्ट्रिक कारला आता टाटा कंपनीची Tata Harrier Electric Car टक्कर देणार आहे. या कारला ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आलेले आहेत. Tata Harrier EV ही एक आलिशान आणि मोठ्या आकाराची लक्झरी कार असणार आहे. ही कार खास करून नव्या पिढीसाठी करता तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या कारचा बॅटरी पॅक 60 kWh असणार आहे. यामुळेच ही कार फक्त एका चार्जवर पाचशे किलोमीटर सहजपणे धावू शकते. 

किती असेल किंमत? 

सध्या बाजारात विक्रीस असलेल्या Harrier या कारला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळालेले आहेत. आता टाटा कंपनीने या नव्या कार मध्ये 19 इंच अलॉय व्हील आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिलेले आहेत. ही जबरदस्त आणि आलिशान कार कसलाही ओबडधोबड रस्ता सहजपणे पार करू शकते. त्याच बरोबर टाटा कंपनीकडून Tata Harrier EV या कारची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच लॉन्च डेट देखील जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र ही कार दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 30 लाखांपर्यंत असू शकते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top