Pune Transport | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! गुगल सोबतच्या करारातून 1 ऑगस्टपासून राबवणार ‘ही’ योजना 

Pune Transport | पुणे हे व्यवसायाचे आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पुण्यात खूप मोठी लोकसंख्या आहे. याचमुळे पुण्यातील रस्त्यांवर कायमच गर्दीच गर्दी असते. पुण्यातील या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा प्रवासातच खूप वेळ जातो. तसेच या वाहतूक कोंडीचा नागरिकांना खूप त्रास देखील होतो. तासंतास गाड्या एका जागी ठप्प होताना दिसतात. आता पुण्यातील याच वाहतूक कोंडीवर उपाय निघाला आहे. यामुळे आता पुणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. 

google traffic solution

वाहतूक कोंडीसाठी गुगलसोबत करार

पुण्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि प्रवासात जाणारा वेळ वाचण्यासाठी आता वाहतूक प्रमुख 32 रस्त्यांवर सुधारणा करण्यात येणार आहे. रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चौक सुधारणा, पार्किंग मॅनेजमेंट, वाहतूक विलगीकरण टेक्नीक्स, वाहतूक नियंत्रण साधने यांच्या माध्यमातून अभिनव योजना राबवण्यात येणार आहे.  वाहतूक कोंडी सुधारण्यासाठी ही योजना राबवण्यासाठी गुगल सोबत करार करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखा आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयातून एक गुगल एप्लीकेशन बनवण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून पुण्यातील रस्त्यांची जास्त वाहने जाण्याची क्षमता वाढेल.

नेमकी काय सुधारणा करण्यात येणार?

रहिवाशी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी रस्त्यांवर चौक सुधारणा करण्यात येणार आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, अद्ययावत सिग्नल यंत्रणा, रस्त्याची सरफेसींग, स्पिड ब्रेकर्स, रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाची साधने बसवणे, रस्त्यावरील वॉटर लॉगिंग पॉईंटस दुरुस्त करणे, पार्किंग मॅनेजमेंट, रस्त्यामधील मिसींग लिंक्स पूर्ण करणे, या रस्त्यांवर नो हॉकर्स झोन करून त्याची अंमलबजावणी देखील करणे, अशा प्रकारची सर्व कामे या अभिनव योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही योजना एक ऑगस्ट पासून राबविण्यात येणार आहे.

काय होणार फायदा? 

जर रस्त्यांमध्ये सुधारणा झाली तर लोकांचा मोठा रस्त्यांवरून जाण्याचा कल वाढेल. त्यामुळे येथील रहिवासी रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल. कारण रस्त्यांना वेग हवा वाहतूक कोंडी नाही. वाहतूक कोंडीच्या रस्त्यावरून जाण्यापेक्षा लोक मुख्य रस्त्यांवरून किंवा हायवेवरून प्रवास करणे अधिक पसंत करतील. रस्ता मोकळा असेल तर लोकांच्या गाडीचा वेग एक समान असतो त्यामुळे रस्त्यांची देखील कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. यामुळे नागरिकांचा फायदा होईलच होईलच आणि रस्त्यांचेही आयुष्य वाढणार आहे. 

Leave a comment