Tata Curvv Coupe SUV: सर्व गाड्यांची बाप ठरणार टाटाची नवी SUV; पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पर्यायात असेल उपलब्ध

मजबूत आणि टिकाऊ कार्सची निर्मिती करण्यात टाटा मोटर्स हे नाव नेहमीच पंसतीने घेतले जाते. त्याचे कारण देखील तसेच आहे. टाटा मोटर्स नेहमीच सुरक्षित आणि मजबूत गाड्यांची निर्मिती करण्यात माहीर आहे. यावेळी तर टाटा मोटर्सने वेगळीच उंची गाठली आहे कारण टाटाने Tata Curvv Coupe SUV हे SUV मॉडेल मधील नवीन कार लाँच करण्याचे ठरविले आहे. तत्पुर्वी आपण या कारबद्दल अधिक माहिती मिळवूया.

2024 Tata Curvv Coupe SUV कधी होईल लाँच?

टाटा मोटर्सनिर्मित नवीन कर्व्ह कूप एसयूव्हीचे अनावरण करण्यात आले असून या कूप एसयूव्हीसह कंपनीने भारतीय बाजारपेठेतही आपले नवे पर्व सुरू केले आहे. टाटा मोटर्सने  Curve चे ICE आणि EV दोन्ही मॉडेल तयार  केले आहेत. हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहेत.  भारतीय बाजारपेठेतील ही पहिली कूप-शैलीतील एसयूव्ही आहे. अशा परिस्थितीत त्याला कोणीही प्रतिस्पर्धी नाही. टाटा कंपनीमार्फत  7 ऑगस्ट 2024 रोजी हे दोन्ही मॉडेल अधिकृतपणे लॉन्च करण्यात येणार आहेत.

Tata Curvv Coupe SUV ने गाठली नवी उंची

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, “टाटा मोटर्सने भारतीय एसयूव्ही क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावली आहे. मूळ सिएरा, सफारी, नेक्सॉन, पंच आणि हॅरियर सारख्या मॉडेल्सला टाटाच्या या मॉडेलने मागे टाकले असे म्हणायला हरकत नाही.

पेट्रोल- डिझेल- इलेक्ट्रिक मॉडेल

टाटा मोटर्स कंपनीने नव्याने लाँच केलेली Tata Curvv Coupe SUV ही कार  पेट्रोल-डिझेल तसेच इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये बाजारात आणण्यात आली हे. त्यामुळे टाटाच्या चाहत्यांमध्ये अधिकच वाढ झाल्याचे दिसून येते. त्याच्या यांत्रिक वैशिष्ट्यांबद्दल अद्याप कोणताही डेटा समोर आलेला नाही. असे मानले जाते की यात 1.2लीटर पेट्रोल जे २५ PS पॉवर आणि 255Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच 1.5 लिटर डिझेल मध्ये इंजिन 115 पीएस पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करेल. इतकेच नाही तर टाटा कंपनीचा दावा आहे की, त्यांची इलेक्ट्रिक कार सर्वोत्तम इन-क्लास ड्रायव्हिंग रेंजसह मार्केटमध्ये लवरकच दाखल होईल.  यात Nexon EV पेक्षा जास्त क्षमतेचा बॅटरी पॅक मिळू शकतो. असे सांगण्यात येत आहे की, ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 500Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकेल.

नवीन लाईफस्टाईल प्रमाणे डिझाईन केलेले Tata Curvv Coupe SUV मॉडेल

असे सांगण्यात येते की, Tata Motors ने 2024 Curve SUV कारला नवीन स्टाईल आणि डिझाइन दिली आहे. नवीन एसयूव्हीमध्ये एलईडी डीआरएल आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत. कंपनीने भारतीय कुटुंबानुसार कर्वची रचना केली असून येत्या काळात या मॉडेलची मागणी वाढणार आहे. या कारमध्ये लाँग ड्राईव्हला जाणे देखील खूप सोपे होईल. या कारमध्ये आधुनिक इंटीरियर देण्यात आले आहे. कंपनीने कारच्या प्रीमियम अपीलवर भर दिला आहे. इतकेच नाही तर केबिनमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि फिचर्स देण्यात आले आहेत. यात पॅनोरामिक सनरूफसह मोठी बूट स्पेस देखील  आहे. कंपनी या कारला दोन नवीन रंगात सादर करत आहे. व्हर्च्युअल सनराइज  या कारच्या  इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये उपलब्ध असेल आणि गोल्ड एसेन्स थीम पेट्रोल व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top