पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत 10 लाखाचे कर्ज कसे घ्यायचे? जाणून घ्या कसा करायचा अर्ज | PM Mudra Loan

PM Mudra Loan | प्रत्येकजण आयुष्यात स्वतःचा बिजनेस करून आर्थिक दृष्ट्या मोठ व्हायचं स्वप्न बघत असतो. परंतु अनेकदा भांडवला अभावी अनेकांचे स्वप्न अपुरेच राहते. कारण कोणताही बिझनेस करायचं म्हटलं की पैसा हा लागतोच. जर तुम्हीही बिझनेस करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि ते स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकार तुमचं व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर योजना राबवत आहे. या योजनेचं नाव ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ (PM Mudra Loan) असे आहे. 

PM Mudra Loan
PM Mudra Loan

केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना ही योजना नागरिकांना छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी चालू केली आहे. एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या पंतप्रधान मुद्रा योजनेची दोन उद्दिष्टे आहेत. ती म्हणजे प्रथम, स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे व दुसरे, लघुउद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणे हे आहे. तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर तुम्हीही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन तुमच्या स्वप्नात साकार करू शकता. हे कर्ज सहजपणे मिळते त्यामुळे नागरिकांमध्ये या कर्जाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. 

पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?  | Who can avail Pradhan Mantri Mudra Yojana? 

पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ स्वतःचा व्यवसाय सुरू करणारे इच्छा असणारी कोणताही व्यक्ती घेऊ शकते. जर तुमचा सध्याचा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जाचे तीन प्रकार पडतात. 

मुद्रा योजनेच्या कर्जाचे तीन प्रकार | Three Types of Mudra Yojana Loans 

शिशू कर्ज: नागरिकांना शिशु कर्ज अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते.

किशोर कर्ज: किशोर कर्ज अंतर्गत, नागरिकांना 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

तरुण कर्ज: तर तरुण कर्ज अंतर्गत, 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज लाभार्थ्यांना देण्यात येते. 

पंतप्रधान मुद्रा कर्जावर किती व्याजदर आकारले जातात? What is the interest rate charged on Prime Minister Mudra Loan?

खरं तर प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कोणताही निश्चित असा ठरवलेला व्याजदर नाही. कारण प्रत्येक बँक वेगवेगळे कर्ज आकारते. त्यामुळे ठराविक असा व्याजदर या योजनेसाठी नाही. तसेच मुद्रा कर्ज घेणाऱ्याच्या व्यवसायाचे स्वरूप व त्याच्याशी संबंधित जोखीम याच्यावर देखील व्याजदर अवलंबून आहे. तरी या योजनेवर किमान व्याज दर 12% इतका असतो. 

मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for Mudra Yojana

घराच्या मालकीची किंवा भाड्याची कागदपत्रे 

कामाशी संबंधित माहिती

आधार कार्ड

 पॅन कार्ड

प्रोजेक्ट रिपोर्ट 

उद्यम आधार रजिस्ट्रेशन 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा कसा घ्यावा लाभ?  How to take advantage of Pradhan Mantri Mudra Yojana? 

जर तुम्हालाही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. तुम्हाला सरकारी किंवा बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला जर तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला बँकेत करंट अकाऊंट ओपन करावे लागेल. तसेच तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची व्यवस्थितपणे पूर्तता करावी लागेल. यासाठी तुम्हाला बँकेच्या मॅनेजरला भेटावे लागेल. बँकेचा मॅनेजर तुमच्या कामाची सर्व माहिती घेतो तसेच तुमचं बँक स्टेटमेंट पाहतो. कागदपत्रांची पडताळणी करून तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवतो. तसेच तुम्हाला कर्ज देण्यासाठी तुमच्या कामावर अवलंबून असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगतो.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज | Online Application for Pradhan Mantri Mudra Loan Scheme 

तसेच तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला सरकारच्या http://www.mudra.org.in/ या मुद्रा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मुद्रा कर्ज योजनेसाठी फॉर्म भरावा लागेल त्यासाठी विचारलेल्या माहितीची पूर्तता करून तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागेल. यानंतर बँक तुम्हाला संपर्क साधते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
WhatsApp Link