आता घरबसल्या चुटकीसरशी काढा ऑनलाईन पासपोर्ट, पासपोर्ट काढण्यासाठी किती असते फी? जाणून घ्या सर्व माहिती 

प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी परदेशात जायचं स्वप्न बघत असतो. तर काहीजण परदेशात जाऊन नोकरीचे स्वप्न पाहतात. पण परदेशात जायचं म्हटल की, सर्वात आधी येतो तो पासपोर्ट. कारण पासपोर्ट (Online Passport) शिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. तसेच परदेशात जाण्यासाठी पासपोर्टसोबत व्हिसा (Passport Visa) देखील लागतो. तुम्ही जेव्हा पासपोर्ट बनवतात त्यानंतरच तुम्हाला व्हिसा मिळतो. ज्याचं कारण म्हणजे पासपोर्ट तुमचं नागरिकत्व सिद्ध करते. तुमचाही परदेशात जाण्याचा विचार असेल आणि तुम्ही अद्यापही पासपोर्ट बनवला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्ही घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने चुटकीसरशी पासपोर्ट बनवू शकता. चला तर मग ऑनलाईन पासपोर्ट कसा काढावा याची प्रोसेस जाणून घेऊया.

Online Passport
Online Passport

ऑनलाईन पासपोर्ट कसा काढावा? How to get passport online? 

सरकारने नागरिकांसाठी पासपोर्ट अर्ज सहज काढता यावा याची प्रोसेस सुलभ व्हावी यासाठी mPassport Seva ॲप लाँच केले आहे. या ॲपमुळे नागरिकांना पासपोर्ट साठी सहज अर्ज करणे शक्य झाले आहे. तसेच यामुळे नागरिकांना कमी शुल्क द्यावे लागणार आहे. पासपोर्ट बनवण्यासाठी फी किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तर तुम्हाला पासपोर्टसाठी 1500 ते 2000 रुपये द्यावे शुल्क द्यावे लागेल. तसेच तत्काळ पासपोर्टसाठी काही अतिरिक्त शुल्क आहेत.    

कोणताही भारतीय नागरिक पासपोर्ट बनवू शकतो. 

सामान्यतः वयस्कर व्यक्तींच्या पासपोर्टची व्हॅलीडीटी ही 10 वर्षांची असते.  

लहान बाळांपासून ते कोणत्याही वयाची व्यक्ती पासपोर्ट बनवू शकते.

ऑनलाईन पासपोर्ट बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत? What are the documents required to make passport online? 

1. 10वी मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा जन्मतारखेसाठी ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक दस्तऐवज आवश्यक आहे)

2. वीज किंवा पाण्याचे बिल, रेशनकार्ड, आयकर विभागाचे मूल्यांकन आदेश, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पत्त्याच्या पुराव्यासाठी बँक पासबुक गरजेचे आहे.

3. परिशिष्ट स्वरूप-1: भारतीय नागरिकत्वाचे प्रतिज्ञापत्र आणि कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावे. 

नवीन ऑनलाईन पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा? How to Apply for New Passport Online? 

 • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये mPassport सेवा ॲप डाउनलोड करावे लागेल. 
 • यानंतर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी New User Registration वर क्लिक करावे लागेल. 
 • आता तुमच्या जवळच्या पासपोर्ट ऑफिसचा पर्याय निवडावा लागेल. 
 • यानंतर तुम्हाला तुमची अनेक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी आणि इतर माहिती टाकावी लागेल. 
 • आता तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल. तुम्ही नेहमी मजबूत पासवर्ड तयार केला पाहिजे.
 • तुम्ही पासवर्ड विसरल्यास, पासवर्ड विसरला हा पर्याय निवडून तुम्ही पासवर्ड पुन्हा तयार करू शकता. 
 • यानंतर कॅप्चा टाका आणि सबमिट निवडा. अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल. 
 • यानंतर पासपोर्ट ऑफिस तुमच्या ई-मेल आयडीवर व्हेरिफिकेशन लिंक शेअर करेल.
 • तुम्हाला लिंकवर क्लिक करून लॉग इन करावे लागेल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला mPassport सेवा ॲप बंद करून पुन्हा लॉग इन करावे लागेल. 
 • आता Apply For Fresh Passport चा पर्याय निवडावा लागेल.
 • यानंतर तुम्हाला सर्व माहिती टाकावी लागेल आणि ॲपवर दाखवलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 
 • आता तुम्ही पासपोर्टचे शुल्क भरा. यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट निश्चित करावी लागेल आणि पासपोर्ट केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागेल.

तसेच तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रात प्रवेश घेण्यासाठी या पावतीची प्रिंटआऊट काढावी लागणार आहे. यासाठी आता नियोजित वेळी पासपोर्ट सेवा केंद्रावर तुम्हाला जावे लागेल. जर तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतील तर तुम्हाला अवघ्या दोन तासांतमध्ये देखील पासपोर्ट मिळू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top