जाणून घ्या गृहकर्ज कोणाला आणि किती मिळते ? काय आहे प्रक्रिया

प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं.अनेक व्यक्तींना घर घेण्याची इच्छा असते, परंतु घर खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसे नसल्यास दुसरा पर्याय गृहकर्ज असतो. गृहकर्ज, ज्याला तारण कर्ज म्हणूनही ओळखले जाते, हे घर खरेदी, बांधकाम किंवा नूतनीकरण करण्याच्या उद्देशाने बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपनीद्वारे दिले जाणारे कर्ज आहे.
या कर्जावर व्याज जमा होते आणि ठराविक कालावधीत मासिक हप्त्यांमध्ये ते परत केले जाऊ शकते. हे कर्ज घर खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते, परंतु कर्जाची पूर्ण परतफेड न झाल्यास, घर बँकेकडे तारण ठेवले जाते.

Home Loan

बँक किती कर्ज देते?

भारतात, बँका सामान्यतः अशी अपेक्षा करतात की तुमच्या एकूण उत्पन्नापैकी निम्मी रक्कम तुमच्या मासिक कर्जाच्या पेमेंटसाठी वापरली जाईल.
म्हणजेच, तुमचा पगार किंवा उत्पन्न जितके जास्त असेल तितकी तुमची मासिक पेमेंट करण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे कर्जाच्या उच्च रकमेसाठी तुमची पात्रता सुद्धा वाढते.
ऑनलाइन होम लोन कॅल्क्युलेटरच्या मदतीने, तुम्ही पात्र असलेल्या कर्जाची अंदाजे रक्कम, कर्जाचा कालावधी आणि अपेक्षित हप्त्याची रक्कम निर्धारित करू शकता.

गृहकर्ज कोणाला दिले जाते?

तुमच्याकडे स्वत: किंवा कुटुंबातील सदस्यासह गृहकर्जासाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे. यामध्ये सह-अर्जदार म्हणून त्यांचा मुलगा किंवा अविवाहित मुलगी असलेले पालक तसेच एकत्र अर्ज करणारे पती-पत्नी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, दोन भाऊ संयुक्तपणे गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात.
संयुक्त कर्ज मिळविण्याचा एक फायदा असा आहे की तो मूळ अर्जदाराच्या व्यतिरिक्त सह-अर्जदाराचे उत्पन्न किंवा पगार एकत्र मोजला जातो, परिणामी कर्जाची रक्कम वाढू शकते.
सह-अर्जदार महिला मालमत्ता मालक असल्यास, मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाते आणि काही बँका महिलांसाठी गृहकर्जावर विशेष सवलत सुद्धा देतात.

गृहकर्ज EMI म्हणजे काय?

कर्जाची परतफेड करताना तुम्ही दर महिन्याला विशिष्ट दिवशी करावयाच्या पेमेंटचा संदर्भ देण्यासाठी वापरला जाणारा शब्द . त्यालाच इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट, म्हणजे EMI म्हणतात.
कर्ज दिल्यानंतर EMI रक्कम केवळ बँकेद्वारे निर्धारित केली जाते.तुम्ही कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम म्हणजे मुद्दल आणि त्यावरचं व्याज, हे दोन्हीही EMI द्वारा फेडलं जातं.

कर्जाची प्रक्रिया   home loan process

1)बँकेची निवड – गृह कर्ज घेण्यासाठी आपल्याला योग्य बँकेची निवड करावी लागते .यामध्ये सरकारी बँक ,खाजगी बँक ,फायनान्स कंपन्या व इतर अनेक पर्याय आहेत ,शक्यतो सरकारी बँक हा चांगला पर्याय आहे. सरकारी बँके तुन घरासाठी कर्ज मिळणे, थोडं अवघड काम असत. पण तिथला व्याज दर कमी असतो , सरकारी योजना व अनेक फायदे सुद्धा असतात. 

2)कर्जाची माहिती – बँकेची निवड केल्यानंतर बँकेत जाऊन कर्जाची संपूर्ण माहिती घेणे. कर्जाची रक्कम ,तिची परतफेड पद्धत , व्याजदर ,सरकारी योजनांचा लाभ , बँकेचे नियम व इतर महत्वाची माहिती घेणे अत्याश्यक आहे. 

3)कर्जासाठी अर्ज – बँकेकडून कर्जासाठी दिलेला फ़ॉर्म व्यवस्थित वाचून भरावा लागतो. 

4)कागदपत्रे – ओळखीचा पुरावा ,उत्पनाचा पुरावा  व इतर अनेक कागतपत्रे आपल्याला जमा करावी लागतात. आपल्या उत्पनाचा विचार करून बँक कर्ज देत असते

5)बँकेकडून तपासणी – संपूर्ण कागदपत्र जमा झाल्यानंतर बँक त्याची तपासणी करते बांधकामाच्या ठिकाणी भेट देते त्याची खात्री करून घेते. आपल्या उत्पानांची तपासणीने करते आणि त्यानंतर कर्ज द्यायचं कि नाही हे ठरवलं जात. 

6)कर्ज मंजुरी – जर आपण कर्ज मिळण्यास पात्र असेल त्यानंतर बँक आपल्या कर्जास मंजुरी देते. 

7)कर्जाची रक्कम मिळणे – वेगवेगळ्या  पद्धतीने कर्जाची रक्कम आपल्याला दिली जाते.. 

नवीन फ्लॅटच्या बाबतीत बँक कर्जाची रक्कम हि बिल्डर किंवा कंस्ट्रक्शन कंपनीच्या अकाउंटला जमा करते . 

8)कर्जाची परतफेड -प्रत्येक महिन्याला हप्ता भरून आपण ५ वर्ष ते ३० वर्ष या मुदतीत कर्जाची परतफेड करू शकतो. आधीमधी  जास्त रक्क्कम भरून कर्जाची मुद्दल कमी करता येते. किंवा कालावधी समाप्त होण्याच्या  आत कर्जाची परतफेड करता येते . पण यासाठी बँकेचे काही वेगवेगळे नियम असतात

अशा प्रकारे सर्व माहिती घेऊन आपल्याला आपल्या स्वप्नातील घर गृहकर्जाच्या मदतीने घेऊ शकतो व आपल्या घर घेण्याच्या स्वप्नाची पूर्तता करू शकतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top