पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये ‘ही’ कागदपत्रे घेऊन जा सोबत! अन्यथा रिकाम्या हाताने यावे लागेल परत | Passport Documents

ता परदेशात जायचं म्हटलं तर पासपोर्ट हा लागतोच. पासपोर्ट शिवाय तुम्हाला परदेशात एन्ट्री मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी पासपोर्ट (Passport) काढूनच घ्या. तरच तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत. तुम्हालाही परदेशात जाऊन नोकरी करायची असते किंवा परदेशात फिरायला जायचं असेल तर आजच पासपोर्ट काढून घ्या. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अवलंब होऊ शकता. तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील तुम्ही पासपोर्ट काढू शकता. पण तुम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन पासपोर्ट काढायचा असेल तर तुम्हाला जाताना कोणती कागदपत्रे सोबत न्यावी लागतील हे पाहूयात. अन्यथा तुम्हाला पासपोर्ट ऑफिसमधून पुन्हा मोकळ्या हाताने परत यावे लागेल. 

पासपोर्ट ही तुमची आणि तुमच्या नागरिकत्वाची ओळख असते. त्यामुळे परदेशात जाताना पासपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. तसेच पासपोर्ट हा परदेशात जाण्यासाठी उपयोगी पडतो असे नाही तर तुम्ही तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून देखील या पासपोर्टचा वापर करू शकता. 

Passport Documents
Passport Documents

पासपोर्ट ऑफिसमध्ये जाताना कोणती कागदपत्रे सोबत न्यावी?

पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला जर पासपोर्ट ऑफिस मध्ये जायचे असेल तर खालील सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जावे.  

  • ओळखीचा पुरावा

तुम्हाला पासपोर्ट ऑफिसमध्ये जाताना तुमच्या ओळखीचा पुरावा घेऊन जावा लागेल. तुमच्या ओळखीचा पुरावा दाखवण्यासाठी तुम्ही आधार कार्ड मतदान कार्ड तसेच पॅन कार्ड हे दाखवू शकता. या कागदपत्रांवरून तुमची ओळख तसेच नागरिकत्व पटेल. 

  • पत्त्याचा पुरावा 

तसेच पासपोर्ट काढताना तुम्हाला तुमच्या पत्त्याचा पुरावा देखील ऑफिसमध्ये द्यावा लागेल. पत्त्याचा पुरावा देण्यासाठी तुम्ही मतदार ओळखपत्र, आधार कार्ड/ई-आधार, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, गॅस कनेक्शन बिल, बँक खाते पासबुक, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, भाडे करार यापैकी एकाची प्रत देऊ शकता.  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now
  • जन्मतारखेचा पुरावा 

पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा पुरावा देखील पासपोर्ट ऑफिसमध्ये द्यावा लागतो. त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट ऑफिसमध्ये जाताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड/ई-आधार, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एकाची प्रत द्यावी लागेल. 

  • फोटो आयडी पुरावा

फोटो आयडी पुरावा हा कोणत्याही कागदपत्रासाठी आवश्यक मानला जातो. तसेच अर्जाचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे तुम्हाला पासपोर्ट काढण्यासाठी ऑफिसमध्ये जाताना फोटो आयडी पुरावा सोबत घेऊनच जावे लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत आधार कार्ड/ई-आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र ही आवश्यक कागदपत्रे न्यावी लागतील.

  • पासपोर्ट साइज फोटो 

तसेच पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो देखील महत्त्वाचे आहेत. कारण भारतीय पासपोर्ट साठी तुम्हाला अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो अर्ज करताना सबमिट करावे लागते. त्यामुळे नवीन फोटो घेऊन जाणे आवश्यक आहे. 

  • जुना पासपोर्ट 

जर तुमच्या जुन्या पासवर्ड मध्ये काही समस्या असेल तसेच जुना पासवर्ड पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही तुमचा जुना पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन जाणे गरजेचे आहे. त्यावेळी उर्वरित कागदपत्रे ही भरताना जुना पासपोर्ट घेऊन जाणे विसरू नका.  

तत्काळ पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी फोटो ओळखपत्र
  • सरकारी संस्थेने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र
  • शिधापत्रिका
  • शेवटचा जारी केलेला पासपोर्ट (लागू असल्यास)
  • मतदारांचे फोटो ओळखपत्र (EPIC)
  • वैध ड्रायव्हिंग लायसन्स
  • अपडेटेड बँक पासबुक, पोस्ट ऑफिस पासबुक किंवा किसान पासबुक
  • पेन्शन दस्तऐवज
  • राज्य किंवा केंद्र सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून सेवा फोटो ओळखपत्र.

पासपोर्ट बनवण्यासाठी फी किती आहे? 

तर तुम्हाला पासपोर्टसाठी 1500 ते 2000 रुपये द्यावे शुल्क द्यावे लागेल. तसेच तत्काळ पासपोर्टसाठी काही अतिरिक्त शुल्क आहेत.   

पासपोर्ट कोणाला बनवता येतो? 

कोणताही भारतीय नागरिक पासपोर्ट बनवू शकतो. 

सामान्यतः वयस्कर व्यक्तींच्या पासपोर्टची व्हॅलीडीटी ही 10 वर्षांची असते.  

लहान बाळांपासून ते कोणत्याही वयाची व्यक्ती पासपोर्ट बनवू शकते.

Leave a comment