शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. परंतु अनेकदा एखादा पिक लावायचं म्हटलं की सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. अशावेळी शेतकऱ्यांना कर्जाची (Agricultural Loan) गरज पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. आज आम्ही या लेखात शेती कर्जाचे कोणकोणते प्रकार आहेत याबद्दलची माहिती सांगणार आहोत.
शेती कर्जाचे किती प्रकार पडतात?
तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया की शेती कर्जाचे किती प्रकार पडतात. तर शेती कर्जाचे बरेच प्रकार पडतात. पण आम्ही तुम्हाला त्यातील जास्त प्रमाणात वापरले जाणारे तीन प्रकार सांगणार आहोत. शेती कर्जाचा पहिला प्रकार म्हणजे पीक कर्ज होय. तर शेती कर्जाचा दुसरा प्रकार मुदत कर्ज असा आहे. शेती कर्जाचा तिसरा माल तारण कर्ज हा आहे. आता हे तीन प्रकार नेमके कसे आहेत यातून शेतकऱ्यांना कसे कर्ज मिळते याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पीक कर्ज
सर्वप्रथम आपण पीक कर्ज काय असते? आणि पीक कर्ज कधी मिळते? तसेच हे पीक कर्ज कशासाठी वापरता येईल याची माहिती पाहुयात. पिकासाठी लागणारा खर्च यासाठी काढता येणारे कर्ज म्हणजे पीक कर्ज होय. या या पिक कर्जातून शेतीची कामे करू शकतात. जसे की, एखाद्या पिकाची लागवड करायची असेल, त्यासाठी लागणारे बी बियाणे, तसेच अंतर्मशागतीचे कामे ,खते, औषधे आणि मजुरांचा खर्च या सर्वांचा समावेश होतो. एकंदरीत बीज मातीत रुजल्यापासून ते काढणीपर्यंत जो काही खर्च येतो तो या पीक कर्जातून भागवला जातो. त्यामुळे पैसे नसले तरी शेतकरी पीक कर्ज काढून आपल्या शेतीमध्ये पिकाची लागवड करू शकतात.
त्याचबरोबर या पीक कर्जाची खासियत अशी आहे की, तुम्ही वर्षभरात कितीही वेळा हे पीक कर्ज काढू शकता. बँकेकडून तुम्ही पीक कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला दिलेल्या मुद्दे मुदतीत हे कर्ज परत करावे लागते. तसेच तुमच्याकडे मुदतीपूर्वी पैसे आले तर तुम्ही ते बँकेला परत करू शकता. तसेच तुम्ही गरज लागल्यास ते पैसे काढूही शकता. यामुळे तुमचे वाढत जाणारे व्याज माफ होते. या पिका कर्जाची मुदत ही एक वर्ष ते तीन वर्ष किंवा पाच वर्षे इतके असते.
पीक कर्जाचे हप्ते
पीक कर्जाचे हप्ते तुम्हाला सहा महिन्यातून किंवा एक वर्षातून नवे-जुने करणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही सहा महिन्यातून किंवा एक वर्षातून त्या कर्जाची परतफेड करून पुन्हा नवीन कर्ज घेऊ शकता.
उदा. तुम्ही 2 लाख कर्ज काढले असेल आणि त्यावर 14 हजार व्याज झाले असेल, तर तुम्हाला वर्षातून एकदा तरी 2 लाख 14 हजार ही पूर्ण रक्कम बँकेला परत करावी लागेल.
मुदत कर्ज
आता आपण शेती करत जातील मुदत कर्जाचा प्रकार समजून घेणार आहोत. एखादा प्रोजेक्ट किंवा शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी जेव्हा एखादा कर्ज काढलं जातं त्या कर्जाला मुदत कर्ज असे म्हणतात. जसे की तुम्हाला शेतात पाईपलाईन करायची असेल, किंवा पोल्ट्री फार्म सुरू करायचा असेल, तसेच तुम्हाला गाई खरेदी करायचा असेल यासाठी काढले जाणारे कर्ज मुदत कर्जात येते. त्याचबरोबर तुम्हाला यातून ट्रॅक्टर खरेदीसाठी आणि शेती अवजारे खरेदी करण्यासाठी देखील कर्ज दिले जाते.
मुदत कर्जात कर्जातून तुम्हाला सुरुवातीलाच जो काही खर्च होतो तो दिला जातो. जसे की तुम्हाला पोल्ट्री फार्म सुरू करायचा असेल तर त्याचे सुरुवातीला लागणारे रक्कम या कर्जातून दिली जाते. पिक कर्जामध्ये जसे तुम्ही तुमच्याकडे पैसे आल्यास त्या कर्जाची परतफेड करू शकता, तसेच लागल्यास ते पैसे काढू शकता. त्याप्रमाणे मुदत कर्जात भरलेले पैसे परत काढता येत नाहीत. मुदत कर्जाची परतफेड करण्याची मुदत ही तीन ते सात वर्ष इतकी असते. मुदत कर्जाची मुदत ही तुमचे कर्ज कोणते आहे तसेच पीक पद्धत कोणती आहे यावर अवलंबून असते.
मुदत कर्जाचे हप्ते
मुदत कर्जासाठी 3, 5 आणि 7 वर्षे इतकी मुदत दिली जाते. मुदत कर्जाचे हप्ते हे तुम्हाला उत्पादन चक्रानुसार पाडून दिलेले असतात. म्हणजेच तुमचा व्यवसाय काय आहे त्यातून तुम्हाला उत्पन्न कधी मिळते किती महिन्याला मिळते यानुसार समान हफ्ते दिले जातात. तुमचा जर दुग्धव्यवसाय असेल तर तुम्हाला महिन्याला त्याचे त्याचा पगार मिळतो. त्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी तुमचा हप्ता हा महिन्याला येऊ शकतो. पोल्ट्रीसाठी तिमाही हप्ता, ट्रॅक्टरसाठी सहामाही हप्ता आणि पाईपलाईनसाठी वार्षिक हप्ता दिला जातो.
माल तारण कर्ज
कर्जाचा हा तिसरा प्रकार म्हणजे माल तारण करतात. तुम्ही बँकेकडे काहीतरी गहाण ठेवून ज्याप्रमाणे कर्ज घेता जसे की गोल्ड लोन. तुम्ही एखादी सोन्याची वस्तू बँकेकडे गहाण टाकता आणि बँक त्यावर तुम्हाला कर्ज देते. त्याचप्रमाणे शेतकरी आपला शेतमाल गहाण टाकून माल कर्ज काढू शकतात. जसे की त्यांच्याकडे असलेले सोयाबीन गहू यांसारखी पीक उत्पादने ते गहाण टाकू शकतात. हा शेतमाल तारण म्हणून बँक घेते आणि त्यावर तुम्हाला कर्ज देते.