घर गहाण ठेऊन कर्ज घेणे किती फायद्याचे असते? घरावर कर्ज कसे घ्यावे? जाणून घ्या | Home Loan By Mortgaging

आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची गरज ही पडतेच. परंतु अनेक जण कर्ज घेताना घाबरतात. कधी कधी कर्ज घेण्यासाठी आपल्याला काही प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवावी लागते. प्रॉपर्टी गहाण (Property Mortgage Loan) ठेवली म्हणजे त्या प्रॉपर्टी चा वापर आपल्याला करता येणार नाही तसेच प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात जाईल या भीतीने अनेक जण कर्ज (Property Loan) घेत नाहीत. त्यामुळे त्यांची स्वप्न ही अपूर्णच राहतात. आज हाच संभ्रम या लेखाद्वारे दूर होणार आहे. कारण होम लोन घेणे फायद्याचे आहे की नाही? तसेच होम लोन (Home Loan) घेतल्यावर घर कोणाकडे राहते? याबाबतची सविस्तर माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

Home Loan by Mortgaging
Home Loan by Mortgaging

गृहकर्ज का घ्यावे?  Why take a home loan?

जेव्हा तुम्हाला प्रॉपर्टी वर लोन घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमचे राहते घर, फ्लॅट किंवा तुमचे दुकान बँकेकडे गहाण टाकू शकता. तुम्ही बँकेकडे तुमचे घर गहाण टाकले तर तुम्हाला त्यावर कर्ज मिळते. या कर्जाला ‘लोन अगेंस्ट प्रॉपर्टी’ असे म्हणतात. या कर्जाची व्याजदर हे पर्सनल लोन पेक्षा कमी असतात. या कर्जाच्या रकमेवर कोणतेही बंधन नाही हे कोणत्याही कामासाठी तुम्ही वापरू शकता. यामुळे हे कर्ज घेणे लोक अधिक पसंत करतात. या कर्जातून तुम्ही नवीन घर बांधू शकता. तसेच घराची दुरुस्ती करू शकता. तसेच लग्नासाठी किंवा आजारपणासाठी तुम्ही हे कर्ज वापरू शकता. त्याचबरोबर नवा व्यवसाय देखील सुरू करू शकता.  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

गृह कर्ज घेतल्यावर घर खाली करावे लागते का? 

गृह कर्ज घेतल्यानंतर कर्जदारांना घर सोडावे लागते, अशी अनेकांची समजूत असते. याच भीतीने अनेकजण गृह कर्ज घेण्यास घाबरतात. परंतु गृह कर्ज घेतल्यानंतर बँकेकडे फक्त तुमची कागदपत्रे राहतात. गृह कर्ज घेऊन देखील तुम्ही त्याच घरामध्ये राहू शकता. त्यामुळे हे लोन अधिक फायद्याचं ठरतं. परंतु तुम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते चुकते केले नाही तर कर्ज चुकवण्यासाठी बँक तुमच्या घरावर जप्ती आणू शकते. 

गृहकर्ज देण्यासाठी बँक काय तपासते? What does a bank check for granting a home loan? 

बँक तुम्हाला गृह कर्ज देण्यासाठी काही गोष्टींची पडताळणी करते. त्यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर काय आहे हे पाहते. अर्जदाराचे मासिक उत्पन्न साधारण किती आहे. तसेच कर्जाची रक्कम काय आहे हे पाहते. तसेच अर्जदाराची नोकरीची प्रोफाइल या सर्व बाबी पाहते. या सर्व गोष्टींच्या आधारे साधारणपणे 30 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी बँक तुम्हाला गृहकर्ज देते. 

गृहकर्जासाठी पात्रता आणि निकष काय आहेत? What are the Eligibility and Criteria for Home Loan? 

  • तुम्हाला जर भारतामध्ये गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही भारतचे रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असला पाहिजे. 
  • तसेच अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तर काही बँकांकडे किमान वय 21 वर्षे देखील आहे. 
  • कमाल वयाबद्दल बोलायचे झाले तर, कर्जाच्या परिपक्वतेच्या वेळी साधारणपणे 70 वर्षे, काही बँका मुदत 75 वर्षांपर्यंत वाढवतात. 
  • तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या मालमत्ता मूल्याच्या 90% पर्यंत असणे आवश्यक आहे.

गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत? What are the required documents for home loan? 

  • ओळखीचा पुरावा आवश्यक

पॅन कार्ड , पासपोर्ट, आधार कार्ड , मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स (कोणत्याही एकाची फोटोकॉपी)

  • वयाचा पुरावा आवश्यक 

आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, दहावीचे मार्कशीट, बँक पासबुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी एक)

  • कायमचा राहण्याचा पुरावा

बँक पासबुक, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिल (वीज बिल, पाणी बिल, गॅस बिल) आणि एलआयसी पॉलिसीची पावती (यापैकी एक) 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top