सध्या संपुर्ण महाराष्ट्रात माझी लाडकी बहिण योजना गाजत आहे. अनेक महिला या योजनेसाठी अर्ज करीत आहेत. या योजनेपाठोपाठ महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण योजनेबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
योजनेचे उद्दिष्ट
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही मुख्यत्वे बेरोजगार तरुणांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांमध्ये तरुणांना कामाचे प्रशिक्षण मिळवून देत नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवृत्त करण्याचा उद्देश आहे.
असे असेल योजनेतील मानधनाचे स्वरुप
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे दर महिना मानधन मिळणार आहे.
· 12 वी पास तरुणांना महिना 6,000/- रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.
· आयटीआय किंवा पदवीका प्राप्त बेरोजगार तरुणांना महिना 8,000/- रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.
· पदवीधर आणि पदव्युत्तर बेरोजगार तरुणांना महिना 10,000/- रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्जदाराची पात्रता
· अर्जदार बेरोजगार तरुण महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
· अर्जदार बेरोजगार तरुणाचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे
· अर्जदाराची किमान किमान शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
· अर्जदाराचाया बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
योजनेचा शासन निर्णय येथे पहा
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407091701223903.pdf या लिंकवर क्लिक करुन तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शासन निर्णय पाहू शकता. व अधिक माहिती मिळवू शकता.