शेतकऱ्याचा अपघात झाल्यास किंवा काही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना राबविली जात आहे. या योजनेनुसार शेतकरी अपघात योजनेचा कुटुंबातील केवळ 2 सदस्यांना लाभ मिळू शकतो. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. Gopinath Munde Shetkari Anudan Yojana
Gopinath Munde Shetkari Anudan Yojana
योजनेचा लाभ कोणाला मिळतो? जाणून घ्या!
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेमध्ये शेतकऱ्याची आई, वडील, शेतकऱ्याची पत्नी शेतकरी स्त्री असेल तर तिचा पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी दोघांना या योजनेचा लाभ दिला जातो.
असा मिळतो लाभ
अपघात किंवा मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते.
अर्जाचा नमुना
खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेसाठी आवश्यक असलेला नमुना अर्ज मिळवू शकता.
महाराष्ट्र शासनाचे योजनेसंबंधिक परिपत्रक
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल, त्याची लिंक खाली दिली आहे, लिंकवर जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करु शकता. तरेच या प्रस्तावासोबत काही कागदपत्रे सादर करावे लागणार आहे ते खालीलप्रमाणे ggopinath munde shetkari anudan yojana.
· सातबारा उतारा.
· मृत्यूचा दाखला.
· शेतकऱ्यांचे वारस असल्याचे प्रमाणपत्र.
· वारसाचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र यापैकी काहीही
· अपघातग्रास्ताचा वयाचा दाखला.
· प्रथम माहिती अहवाल किंवा घटनास्थळाचा पंचनामा.
· पोस्ट मोर्टेम अहवाल.
या कारणासाठी मिळते योजनेमार्फत आर्थिक मदत
अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अनुदानाचा लाभ पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, आई, वडील किंवा सून यांना दिला जातो.खालील कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांनी आर्थिक लाभ मिळतो. gopinath munde shetkari anudan yojana.
· रस्ता किंवा रेल्वे अपघात.
· शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास
· शेतकऱ्यास जंतू नाशके हाताळतांना विषबाधा झाल्यास.
· शेतकऱ्यास विजेचा शॉक लागल्यास.
· शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्यास.
· उंचावरून पडून शेतकऱ्याचा अपघात झाल्यास
· शेतकऱ्याला सर्पदंश किंवा विंचू दंश झाल्यास.
· जनावर चावल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास.
· शेतकरी महिलेचा बाळंतपणातील मृत्यू.