तीर्थ दर्शनासाठी मिळणार तब्बल ₹30,000 रुपये अनुदान !! पहा काय आहे तीर्थ दर्शन योजना संबंधी शासन निर्णय !

अनेकांना देवदर्शनाची आवड असते. अनेकजण वयाच्या 60 नंतर देवदर्शनाला जाण्याचे ठरवून ठेवतात. परंतु हातात जमापुंजी नसल्यास त्यांना प्रवासातील खर्च उचलता येत नाही. महाराष्ट्र शासनाने 14 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा शासन निर्णय जाहीर करण्याच आला आहे. चला तर मग या योजनेसाठी कोण कोण पात्र ठरणार आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल या लेखाच्या माध्यमातून सविस्तर माहिती मिळवूया!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना?

महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती लाभार्थी होऊ शकतील. लाभार्थ्यांना तीर्थ दर्शनासाठी अनुदान म्हणून 30 हजार रुपये शासनामार्फत देण्यात येणार आहे. चला तर मग या योजनेचा शासन निर्णय पाहू.

शासन निर्णय

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407141449472222%E2%80%8D….pdf

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही वरील लिंकवर क्लिक करु शकता.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता

·      अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्याक आहे.

·      नागरिकांचे वय कमीत कमी 60 किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

·      अर्जदाराचे उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

·      रेशन कार्ड, आधार कार्ड

·      महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला.

·      वैद्यकीय प्रमाणपत्र.

·      पासपोर्ट आकाराचा फोटो.

येथे करा ऑनलाई अर्ज

योजनेसाठी योग्य पद्धतीने ऑनलाईन अर्ज करुन 30 हजार रुपयांचे अनुदान मिळवू शकता. यामध्ये वयोवृद्धांना ज्या तीर्क्षत्रेत्राची निवड करायची आहे ती करु शकतात. या योजनेमुळे अनेक वयोवृद्धांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेतू सुविधा केंद्रावर या योजनेसंबंधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करता येईल.

आर्थिक अडचणीमुळे ज्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ यात्रेस जाणे शक्य होत नाही अशांना शासनाच्या अनुदान योजनेमार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच वयोवृद्धांना तीर्थ यात्रा करण्याचे स्वप्न पुर्ण करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही शासन निर्णय पाहू शकता.

Leave a comment