Petrol vs EV Scooter: पेट्रोल की इलेक्ट्रिक कोणती स्कूटर चांगली. कोणती बाईक देईल जास्त मायलेज

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सध्या  इलेक्ट्रिक व्हेईकलची लोकप्रियता वाढत चालली आहे.  शहरी भागामध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर पेक्षा ई-स्कूटर घेणे अनेकजण जास्त पसंत करीत आहेत. तुम्हाला देखील नवीन स्कूटर घ्यायची असेल आणि तुम्ही पेट्रोलची स्कूटर घ्यायची की, इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची अशा संभ्रमात असाल तर आम्ही तुमच्यासाठी तुमचा हा संभ्रम दूर करणारी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. EV scooter

पेट्रोल की इवी
पेट्रोल की इवी

यानुसार ठरवा कोणती स्कूटर घ्यायची

कोणतीही स्कूटर खरेदी करताना ड्रायव्हिंग रेंज, चार्जिंग, रनिंग कॉस्ट, बजेट आणि बॅटरी वॉरंटी या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे वाहनचालकासाठी गरजेचे ठरते. इतकी वर्षे आपण पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने वापरत आहोत. त्यामुळे नवा पर्याय निवडताना म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेइकलचा पर्याय निवडताना बऱ्याच गोष्टींची चापणी करणे गरजेचे असते. त्याशिवाय तुम्ही कोणतेही वाहन घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही. EV scooter

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची वॉरंटी

इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याआधी  काही गोष्टींची माहिती करुन घेणे गरजेचे ठेरते  ते म्हणजे,  जी स्कूटर खरेदी करणार आहात, तिच्या बॅटरीला किती वर्षांची वॉरंटी मिळणार आहे?  

मार्केट मधील सर्वच इलेक्ट्रिक स्कूटर पाहता इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला पाच ते सात वर्षांची वॉरंटी दिलेली असते.  Petrol vs EV scooter

तुमचे बजेट किती आहे?

स्कूटर खरेदी करण्यापूर्वी तुमचं बजेट किती आहे ते ठरवा.  तुमचं बजेट कमी असेल, तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये चांगली ड्रायव्हिंग रेंज व उत्तम फीचर्स असणारी इलेक्ट्रिक स्कूटर येऊ शकते का, याचा अंदाज घेण्यासाठी मार्केट रिसर्च करा. काही इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या शेरुम्समध्ये जाऊन टेस्ट ड्राईव्ह करुन बघा.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्याचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत  नक्कीच कमी येतो परंतु स्कूटर चार्ज कुठे करणाच याचा देखील तुम्ही विचार करणे गरजेचे असते. तुम्ही राहत असलेल्या परिसरात चार्जींग सेंटर असेल तर उत्तम नसेल तर तुमच्या घरीच तुम्ही स्कूटरची बॅटरी कशी चार्ज करणार आहात याची योग्य ती तयारी करुन ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण एखाद्या दूरच्या प्रवासात तुमच्या स्कूटरची बॅटरी संपली तर तुम्हाला नाहक त्रास होऊ शकतो. EV scooter

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top