Gold Silver stocks in Focus मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी भारताच्या अर्थमंत्री निरमला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये सोने चांदी आणि प्लॅटिनमवरी सीमा शुल्क कमी केल्याची घोषणा केली. त्यानंतर सोने चांदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. त्यासंदर्भात आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवूया.
या कंपन्यांचे शेअर्स 9 टक्क्यांनी वधारले
दिनांक 23 जुलै 2024 रोजी आर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्या चांगीच्या कस्टम ड्युटी दरात कपात करुन 10 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली आहे. कल्याण ज्वेलर्स, पीसी ज्लेलर्स, सेनको गोल्ड ज्लेवलर्स आणि टायटन या सोन्याच्या कंपन्यांचे शेअर्सची किंमत 9 टक्क्यांनी वधारली आहे. Gold Silver stocks in Focus
अर्थसंकल्पानंतर या दागिन्यांची खरेदी वाढली
अर्थसंकल्पातील घोषणेनंतर गुंतवणूकदारांनी सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिने विकणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सची मोठी खरेदी करण्यात सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पानंतर सोन्या – चांदीच्या दरात 3000 रुपयांनी घसरण झाली. पीसी ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आता 77.84 रुपयांवर पोहोचला आहे. अपर शेअरनंतर या कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्याचा 52 आठवड्यातील नीचांकी स्तर 25.45 रुपये आहे.
सेन्को कंपनीच्या शेअर्सच्या किंमती मध्ये आलेली वाढ
सेन्को ही सोन्या चांदीचे दागिने घडवणारी मोठी कंपनी आहे. सेन्को गोल्ड कंपनीचा शेअरची किंमत वाढून 998 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांकी दर 1777 रुपये आणि निचांकी 365 रुपये आहे. Gold Silver stocks in Focus
मणप्पुरमच्या शेअर्समध्ये देखील तेजी
मणप्पुरम ही देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांचा व्यवहार करणारी प्रसिद्ध कंपनी आहे. अर्थसंकल्पानंतर या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये देखील तेजी आल्याचे दिसून आले आहे. ज्या ज्या गुंतवणूकदारांनी या कंपन्यांचे शेअर्स घेतले होते ते आजच्या तारखेला दुप्पट तिप्पट परतावा मिळवीत आहेत.
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क कितीने कमी
आजच्या तरुणाईमध्ये प्लॅटिनमचे दागिने जास्त प्रमाणात वापरले जातात. सोन्याइतकेच प्लॅटिनमचे महत्त्व आहे आणि या प्रकारचे दागिने अत्यंत मोहक आणि सुंदर दिसतात. अर्थसंकल्पामध्ये प्लॅटिनमवरील सीमाशुल्क 6.4 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्लॅटिनमचे दागिने देखील आता 5 ते 6 हजारांनी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे तरुणाईमध्ये एक आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. Gold Silver stocks in Focus