काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना? कोणाला मिळणार वर्षाला 3 गॅस मोफत, पाहा सविस्तर | Mukhyamantri Annapurna Yojana

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024- 25 चा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात (Budget 2024- 25) राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आर्थिक (Financial) दुर्बल घटकात घटकातील महिलांना स्वयंपाक करण्यासाठी मोफत गॅस सिलेंडर (Gas Cylinder) देण्यासाठी देखील एका महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे

Mukhyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Annapurna Yojana

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

2024 25 च्या अर्थसंकल्पात खूप महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. तर महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’सोबतच ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ देखील सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना गॅसचे दर जास्त असल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पात या योजनेची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना का सुरू करण्यात आली? 

आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांचे व महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासन राज्यातील जवळपास 52 लाखांहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ देणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर देखील चांगलाच आर्थिक भार पडणार आहे.

ज्या कुटुंबामध्ये पाच सदस्य असतील अशा कुटुंबांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने (Mukhyamantri Annapurna Yojana) अंतर्गत वर्षाला मोफत तीन गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. राज्याच्या 2024 आणि 25 या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांपैकी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. जनतेच्या हितासाठी एकापाठोपाठ राज्य सरकार एक- एक निर्णय घेत आहे. 

काय आहे ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’चा उद्देश? 

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना अन्नसुरक्षा देणे हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून या लोकांना आर्थिक सहाय्य लाभेल आणि त्यांना त्यांच्या इतर मूलभूत गरजा पूर्ण करणे शक्य होईल. तसेच राज्य शासनाने राज्यातील गरिबी घटवण्यासाठी या योजनेची सुरुवात केली.

या योजनेच्या माध्यमातून स्वस्त दरात पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याचे राज्य शासन यातून काम करत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात तांदूळ, गहू आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आता या योजनेच्या अटी शर्ती काय आहे याबद्दल माहिती जाणून घेऊयात. 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोण असेल पात्र? 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभधारक हा आर्थिक दुर्बल घटकातील असणे आवश्यक आहे.तसेच लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे वैद्य शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. 

लाभ घेणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील कायमची रहिवासी असणे असली पाहिजे. तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेमध्ये असणे गरजेचे आहे. 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ अशा कुटुंबांना मिळणार आहे ज्या कुटुंबामध्ये 5 सदस्य असतील. अशा कुटुंबांना वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top