मिनी ट्रॅक्टर योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. सामाजातील आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या या बचत गटांना या योजनांच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचा हेतू आहे. चला तर मग बचत गटांना मिळणाऱ्या अनुदानित मिनी ट्रॅक्टर संबंधित अधिक माहिती जाणून घेऊया.
Mini Tractor Yojana
किती क्षमतेचा ट्रॅक्टर देण्यात येणार आहे
स्वयंसहायित बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याच्या योजनेत ट्रॅक्टर खरेदी करण्याची आर्थिक मर्यादा ठरविण्यात आलेली आहे. तसेच किती क्षमतेचा मिनि ट्रॅक्टर घ्यायचा हे देखील योजनेअंतर्गत ठरवुन देण्यात आले आहे. 9 ते 18 HP चा मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने असलेल्या कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर आणि ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
योजनेसाठी बचत गटाची आवश्यक पात्रता
· स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
· स्वयंसहाय्यता बचत गटातील अध्यक्ष, सचिव आणि 80 टक्के सदस्य हे अनुसूतीच जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत
मिनी ट्रॅक्टर खरेदीची कमाल मर्यादा
मिनी ट्रॅक्टर खरेदीची कमाल मर्यादा ही 3 लाख 50 हजार इतकी ठरविण्यात आली आहे. या रकमेच्या 10 टक्के हिस्ता स्वयंसहाय्यता बचत गटांनी भरल्या नंतरच शासकीय अनुदान देण्यात येईल. स्वयंसहाय्यता संस्थांचे राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. या खात्याशी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांचे आधार क्रमांक जोडलेले असणे आवश्यक आहे.
मिनी ट्रॅक्टर योजना चा फायदा कसा होईल?
बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देण्याच्या या योजनेचा नक्कीच फायदा करुन घेता येईल. मग हा फायदा कसा करुन घ्यायचा त्याबद्दल आपण अधिक माहिती मिळवूया.
· योजनेच्या मदतीने 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर घेतल्या नंतर त्या तो ट्रॅक्टर ग्रामिण भागात शेतीसाठी भाड्याने देता येऊ शकतो.
· आलेल्या पैशांचे योग्य नियोजन करुन बचत गटाच्या खात्यात सेवींग करावी किंवा एखाद्या प्रकल्पात गुंतवता येऊ शकतात.
· बचत गटाची जमीन असेल तर शेती करण्यासाठी या मिनी ट्रॅक्टरचा उपयोग करता येईल. Mini tractor scheme
अधिक वाचा – राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज, पण फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार फायदा
मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज भरण्याची अंतिम तारीख
स्वयंसहायित बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करा. https://sjsa.maharashtra.gov.in/mr/schemes-categories-0 या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अर्ज करु शकता. दिनांक 16 ऑगस्ट 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. Mini tractor scheme