पर्सनल अकाउंटमध्ये आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; नवीन Bank account cash deposit rule जाणून घ्या
भारतात डिजिटल बँकिंगला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण नागरिकांचा, बँकांचा आणि वित्तिय संस्थांचा ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्याकडे जास्त ओघ दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढील काही वर्षांना भारत हा जगातील सर्वात मोठा ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणारा देश ठरेल या काहीच शंका नाही. आत्ताच काही दिवसांपुर्वी आयकर विभागाने कॅश डिपॉझिट करण्यावर मर्यादा लावली आहे. अशी मर्यादा एकेकाळी डिमॉनिटायझेशनच्या वेळेस लावण्यात आली होती. परंतु आयकर विभागाने घेतलेया निर्णयामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. चला तर मग जाणून घेऊ की किती रकमेपर्यंत आपण आपल्या अकाऊंटमध्ये कॅश डिपॉझिट करु शकतो.
भारतात कॅशलेस इकॉनॉमीला चालना
आयकर विभागाने कॅश डिपॉझिटवर मर्यादा लावण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात कॅशलेस इकॉनॉमीला चालना देता यावी. तसेच कॅशने केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे अनेक गैर व्यवहार होण्याची शक्यता असते.
खेड्यापाड्यांमध्ये बँकेत अकाउंट असणाऱ्यांच्या संख्येत वाढ
सध्या शहरीच नाही तर ग्रामिण भागात देखील ऑनलाईन बँकिंगचा उपयोग वाढला आहे. खेड्यापाड्यांमध्ये बँकेत अकाऊंट ओपन करुन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच UPIच्या मदतीने ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यमुळे कॅशने व्यवहार करणाऱ्यांची संख्या तशीही कमी होत असताना दिसून येत आहे.
ऑनलाइन आर्थक व्यवहार केल्यामुळे देशात खेळते अर्थव्यवहार राहतात. देशाला त्याचा फायदाच होतो आणि कॅशमुळे आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवता येत नाही आणि कॅश असलेल्या रकमेवर कोणताही कर लावता येत नसल्याने देशाच्या आर्थिक उन्नत्तीमध्ये त्याचा काहीच फायदा होत नाही. Bank account cash deposit rule
बचत खात्यात कॅश डिपॉझिट करण्याचे नियम
· 50 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम तुम्ही तुमच्या बँकेज डिपॉझिट करु इच्छित असाल तर बँक तुमच्याकडे तुमचे पॅन कार्ड मागेल.
· बचत खात्यात एका दिवसाला केवळ 1 लाख रुपयेच डिपॉझिट करता येणार आहेत.
· जे लोक नेहमी नेहमी पैसे डिपॉझिट करीत नाही त्यांना 2.5 लाखापर्यंत एका दिवसात पैसे डिपॉझिट करता येऊ शकतात.
· एका वर्षात बँक खातेधारकाला त्याच्या अकाऊंटमध्ये 10 लाख रुपये जमा करता येतील. यापेक्षा जास्त पैसे असल्यास बचत खातेधारकाची चौकशी आयकर विभागामार्फत होऊ शकते.
Post Comment