राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकरी मोठ्या आशेने पावसाची वाट बघत होते. तर दुसरीकडे मान्सूनने देखील लवकर आगमन केले. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर राज्यात मान्सून (Monsoon Update) दाखल झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी वाट न पाहता पेरणीची घाई केली. पण आता हवामान विभागाने (Meteorological Department) मान्सूनबाबत अंदाज वर्तवला. या अंदाजानुसार शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाहीर करण्यात आला आहे.
Table of Contents
राज्यात पाऊस कसा आहे?
आज मान्सून राज्यातील हर्णाई, बारामती आणि तेलंगणातील निझामबाद येथे पोहोचलो आहे. मान्सून पुढे सेकण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील (Maharashtra Weather Update) अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. परंतु अजून देखील पेरणी करण्यासाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. तसेच मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच पेरण्या करण्याची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईसोबतच संपूर्ण कोकणात आजपासुन पुढचा पूर्ण आठवडा जोरदार पाऊस चालणार आहे.
शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?
शेतकऱ्यांनो 15 जूनपर्यंत पावसाचा जोर हा कायम राहणार आहे. परंतु 15 जूननंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विदर्भात पावसाची तुरळक पावसाची शक्यता जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. तसेच शेतकऱ्यांनी खात्री असलेल्या सिंचनाच्या विश्वासावर 30 ते 40 दिवस पीक तग धरेल अशाप्रकारे 20 जून दरम्यान पेरणी करण्याचे धाडस करावे