10 जूनपासून या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश डिपॉझिट करता येणार नाही!

जानेवारी 2024 पासून भारतातील बँकांच्या विविध नियमांमध्ये बदल करण्यात आले. अनेक नियम नव्याने बनविण्यात आले. आर्थिक व्यवहार चोख आणि कोणत्याही अडशळ्याविना व्हावेत यासाठी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना डिजिटल सेवा द्यावी असे केंद्र शासनाने जाहीर केले. तसेच बेकायदेशीर आणि बेहिशेबी रेख व्यवहारांना लगाम लावण्यासाठी कॅश डिपॉझिट करण्याबाबत देखील भारत सरकारने काही नवे नियम जाहीर केले आहेत. नक्की कोणते आहेत ते नियम आपण जाणून घेऊ. 

bank cash deposit new rules
bank cash deposit new rules

कॅश डिपॉझिट करण्यासाठी पॅनकार्ड आणि अनिवार्य

10 जून 2024 नंतर तुम्ही तुमच्या बँकेत कॅश डिपॉझिट करायला घेऊन जात असाल तर तुम्हाला सोबत पॅनकार्ड आणि तुमचे आधारकार्ड देखील घेऊन जावे लागणार आहे. त्याशिवाय कोणत्याही नागरिकाची कॅश डिपॉझिट केली जाणार नाही. वेळोवेळी शासनाकडून बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याबाबत सुचना आल्या होत्या. अनेक नागरिकांनी अजूनही या सुचनांचे पालन केलेले नाही. बँक खात्याशी पॅन कार्ड कनेक्ट असतेच परंतू आधार कार्ड देखील लिंक असणे अत्यंत गरजेचे असते असे वेळोवेळी RBI कडून सांगण्यात आले आहे. 

मोठ्या रकमांच्या कॅश डिपॉझिटवर नियंत्रण

मोठ्या रकमांच्या कॅश डिपॉझिटवर नियंत्रण रहावे यासाठी शासनाने हा नियम लागू केला आहे. तसेच एखाद्या बँक खात्यातुन तुम्हाला 1 लाखाहून जास्तीची रक्कम काढायची असल्यास देखील पॅनकार्ड आणि आधारकार्ड या दोन ओळखपत्रांशिवाय रक्कम काढता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुमच्या बँकेत जाल तेव्हा तुम्ही पॅनकार्ड आणि आधारकार्ड ही दोन कागदपत्रे सोबत ठेवा. जेणेकरून बँकेशी कोणतेही आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला अडचण येणार नाही. Bank cash deposit rule changed

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top