प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक तारखेला नियमांमध्ये बदल होतात. मग ते बदल तुमच्या ईएमआयबाबत असतात, तर कधी गॅस सिलेंडरच्या नियमांबाबत असतात. एकंदरीत 1 ऑगस्ट पासून आर्थिक नियमांमध्ये (Economic Rules) बदल होणार आहेत. या बदलत्या नियमांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. 1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये तसेच दरामध्ये देखील बदल होणार आहेत. चला तर मग गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये ( LPG Gas cylinder Rule) आणि काय बदल होणार आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरचे बदलणार दर
महिन्याची सुरुवात ही आर्थिक बदलांपासून सुरू होते. त्याचवेळी एक ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरचे दर बदलण्याची शक्यता आहे. ज्याचं कारण म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला तेल विपणन कंपन्या दरामध्ये बदल करत असतात. त्यानंतर नवीन दर ठरवले जातात. त्याचवेळी गॅस सिलेंडरचे दर देखील नव्याने जाहीर केले जातात.
मग ते कधी कमी होतात तर कधी वाढतात. जुलै महिन्यामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात देखील या व्यवसायिक सिलेंडरच्या किमती कमी होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर गॅसच्या नियमांमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे.
1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरच्या नियमात होणार बदल
ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या दरावर सवलत दिली जाते. तर ही दिली जाणारी सवलत बंद करण्यात येणार आहे. म्हणजेच पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस देण्यात आले आहेत. ज्या महिलांना या योजनेअंतर्गत गॅस मिळाले आहे त्या महिलांना गॅस सिलेंडर वर सबसिडी देण्यात येते. सध्या गॅसच्या किमती 900 रुपयांच्या आसपास आहेत. याचप्रमाणे महिलांना तीनशे रुपये सबसिडी गॅस सिलेंडर वर देण्यात येते.
मात्र वारंवार सांगून देखील अनेक महिलांनी आपल्या गॅसची केवायसी केलेली नाही. गॅसची केवायसी न केलेल्या महिलांना मिळणाऱ्या सिलेंडर वरचे 300 रुपयांचे अनुदान बंद होणार आहे. त्यामुळे महिलांना गॅसची केवायसी करणे प्रचंड गरजेचे आहे. ज्या महिला आपल्या गॅसची केवायसी लवकरात लवकर करून घेणार नाहीत त्यांना 300 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. गॅस केवायसीसाठी 31 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.