तुम्ही ट्रेंडिंग न्यूज फॉलो करीत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की, सध्या सोशल मीडियावर BSNL ट्रेंड करीत आहे. इतकेच नाही तर भारतातील करोडो नागरिक खाजगी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करीत आहेत. Airtel, Jio आणि Vodafone Idea चे रिचार्ज प्लॅन्स महाग झाल्यानंतर भारतात सर्वच राज्यांमध्ये BSNL सिमची विक्री तीन पटीने वाढल्याचे देखील निदर्शनास येत आहे. इतकेच नाही तर लाखो युजर्सनी त्यांचे सिम बी.एस.एन.एल कडे पोर्ट केले आहे. भारतीय नागरिक खाजगी नेटवर्क कंपन्यांच्या दरवाढीला कंटाळून मुळ सरकारी कंपनी असलेल्या BSNL म्हणजेच Bharat Sanchar Nigam Limitedची निवड करीत आहेत.
देशभरात अनेकांनी पसंत केले बी.एस.एन.एल नेटवर्क
जुन महिन्यात बिएसएनएलच्या नव्या ग्राहकांचा आकडा दररोज 150 इतका होता. इतकेच नाही तर फक्त 6 दिवसांत बीएसएनएलचे 2500 नवीन ग्राहक तयार झाले आहेत. एका अभ्यासपूर्ण अहवालात असेही म्हटले गेले आहे की, राजस्थानमध्ये अवघ्या एका महिन्यात 1,61,083 लोक बीएसएनएल सोबत जोडले गेले आहेत. याच कालावधीत, 68,412 ग्राहकांनी Airtel कंपनीच्या सेवेचा आणि 6,01,508 ग्राहकांनी Jio कंपनीच्या सेवेला रामराम ठोकला आहे
BSNL चे 4G नेटवर्क पुढच्या महिन्यात सुरू होणार
बी.एस.एन.एल या सरकारी मोबाईल नेटवर्क कंपनीची 4G सेवा ऑगस्टमध्ये भारतात सर्व ठिकाणी सुरु होणार आहे. यामध्ये सुरुवातीला ग्राहकांना फ्री मध्ये 4G सिम कार्ड मिळतील असे भारत दूरसंचार विभागाकडून सांगण्यात येत आहे.तसेच ग्राहकांचे सिमकार्ड सुद्धा मोफत 4G वर अपग्रेड केले जातील.