एटीएम कार्डची कसे सुरक्षित ठेवावे? लगेच जाणून घ्या अन्यथा तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं | ATM Card Safety

पैसे काढण्यासाठी सतत बँकेच्या फेऱ्या कराव्या लागत होत्या म्हणून ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा आली आहे. एटीएममधून (ATM Card Safety) ग्राहक 24 तासांत कधीही पैसे काढू शकता. एटीएमचे खूप फायदे आहेत. पण एटीएमचे (ATM Card) जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत. ज्याचं कारण म्हणजे तुमच्या एटीएमचा कोणी गैरवापर केला तर तुमचं बँक खातं (Bank Account) नक्कीच रिकामं होऊ शकतं. म्हणूनच तुम्ही एटीएम बाबत सतर्कता बाळगली पाहिजे. आज आपण एटीएम कार्ड बाबत कोणती सतर्कता बाळगली पाहिजे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ATM Card Safety
ATM Card Safety

एटीएममध्ये जाताना कोणती खबरदारी घ्यावी?

ज्यावेळी तुम्ही एटीएममध्ये जाता त्यावेळी तेथे प्रवेश करताना सुरुवातीपासूनच सतर्कता बाळगली पाहिजे. एटीएम मध्ये जाताना तिथे दुसरा कोणी व्यक्ती आहे का हे पहावे. तसेच पिन टाकताना आजूबाजूला कोणी आहे का?याची व्यवस्थित खात्री करूनच आपला एटीएम कार्डचा पिन टाका. 

अनोळखी व्यक्तींना मदत मागू नका 

कधीकधी एटीएम मध्ये गेल्यावर वृद्ध किंवा निरक्षर व्यक्तींना एटीएम मधून पैसे काढण्यास अडचण येते. त्यावेळी अशा व्यक्ती अनोळखी व्यक्तींना देखील पैसे काढण्यासाठी मदत मागतात. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्याचं कारण म्हणजे अनोळखी व्यक्ती तुमच्या याच निरक्षरपणाचा गैरफायदा घेऊन तुमचं बँक खातं रिकाम करू शकतात. म्हणूनच एटीएम मध्ये गेल्यानंतर कधीच अनोळखी व्यक्तींना मदत मागण्याची चूक करू नका. याबाबत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

तुमचा एटीएम कार्डचा पिन गुप्त ठेवा 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा पिन गुप्त ठेवला पाहिजे. एटीएम कार्डचा पिन गुप्त ठेवल्यामुळे तुम्हाला एटीएम कार्ड संदर्भात कोणतीही अडचणी येणार नाही. म्हणजेच कोणी तुमच्या एटीएम कार्डचा पिनचा वापर करून गैरफायदा घेऊ शकत नाही. तुमचा पिन लक्षात ठेवा तसेच तो कुठेही लिहू नका आणि कार्डवर तर अजिबात लिहू नका. तसेच तुमचे कार्ड तुमच्या वैयक्तिक वापरासाठी आहे. त्यामुळे तुमचा पिन किंवा कार्ड कोणासोबतही शेअर करू नका. मग अगदी तुमचा मित्र असला तरीही. 

तुमच्या बँकेची मदत घ्या 

जर एटीएम कार्ड वापरताना तुम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या तर तुम्ही तुमच्या बँकेला याबाबत मदतीसाठी विचारणा केली पाहिजे. जर काही समस्या निर्माण झाली असेल तर बँकेकडून तुम्हाला कळवण्यात येईल. यामुळे आर्थिक फटका बसण्यापासून तुमचा बचाव होईल. कधी कधी एटीएममध्ये तुमचे कार्ड अडकू शकते. अशावेळी लगेच तुमच्या बँकेला टोल फ्री क्रमांकावरून फोन लावा. कारण मशीनमधून पैसेही बाहेर येणार नाहीत आणि तुमचे कार्डही त्यामध्ये फसू शकते. तसेच तुमचे एटीएम कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास लगेच तुमच्या बँकेची संपर्क साधा. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

एटीएममधून पैसे काढताना कोणती खबरदारी घ्यावी? 

तुम्ही एटीएम मध्ये पैसे काढायला गेल्यावर ज्यावेळी मशीन जवळ उभे राहता त्यावेळी तुम्ही तुमच्या कार्डचा पिन टाकताना कीपॅड तुमच्या हाताने झाकून टाका. जेणेकरून तुमच्या पाठीमागे असलेल्या व्यक्तीला तुम्ही टाकत असलेला पिन दिसणार नाही. त्याचबरोबर पिन टाकून पैसे काढल्यानंतर एटीएम वरून झालेली सर्व प्रोसेस डिलीट करून टाका. यामुळे तुमच्या नंतरचा व्यक्ती ती माहिती पाहू शकणार नाही आणि तुमचे एटीएम कार्ड सुरक्षित राहील. 

रोख रक्कम गर्दीत मोजू नका 

आता तुम्ही एटीएम कार्ड मधून मोठी रक्कम काढत असाल तर त्यावेळी देखील योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुम्ही एटीएम मधून रोख रक्कम काढल्यानंतर योग्य ठिकाणी जाऊन पैसे मोजावे. अन्यथा एटीएममध्ये असणाऱ्या व्यक्ती देखील तुमचे पैसे चोरू शकतात. तसेच एटीएममधून पैसे काढल्यावर रक्कम मोजण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदतही घेऊ नका. त्याचबरोबर तुमची ट्रांजेक्शन स्लीप देखील तेथून घेऊन जायचं विसरू नका. तसेच ट्रांजेक्शन स्लिप लगेच फाडूनही टाका. यामुळे तुमचे एटीएम सुरक्षित राहील. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
WhatsApp Link