एलआयसीची आधार शिला योजना’ माहितीये का? छोट्या गुंतवणुकीतून मिळवा मोठा परतावा | LIC Aadhar Shila Scheme

आपलं पुढचं आयुष्य सुखात जावं म्हणून अनेकजण गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढे निवृत्तीच्या काळात मोठी रक्कम मिळावी यासाठी सुरुवातीपासून गुंतवणूक केली पाहिजे. यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्याचं टेन्शन राहत नाही. यासाठी ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ फायदा देणारी पॉलिसी म्हणजे एलआयसी. एलआयसी प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना छोटी मोठी बचत गुंतवणूक करून पुढे चांगला नफा मिळावा हा प्रयत्न आहे.  आज आपण एलआयसीच्या (LIC Scheme) अशाच एका योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्या द्वारे तुम्ही कमी गुंतवणूक गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवू शकता. एलआयसीच्या या योजनेचे नाव ‘एलआयसी आधार शिला योजना’ आहे.

LIC Aadhar Shila Scheme
LIC Aadhar Shila Scheme

एलआयसी आधार शिला योजना

‘एलआयसी आधार शिला योजना’ ही एक वैयक्तिक व नॉन लिंक्ड सहभागी जीवन विमा पॉलिसी आहे. ‘एलआयसी’ (LIC) ने महिलांसाठी अनेक योजना (LIC scheme for women) सुरू केल्या आहेत. याच योजनांपैकी एक असलेली ही ‘एलआयसी आधार शिला योजना’ जी महिलांच्या जीवनाचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही दीर्घकाळासाठी मजबूत परतावा मिळवू शकता. या योजनेत महिलांसाठी संरक्षण आणि बचतीचे वैशिष्ट्यही समाविष्ट आहे.   

LIC आधार शिला पॉलिसी’चे वैशिष्ट्ये आणि फायदे  | Features and Benefits of LIC Aadhaar Shila Policy 

आता आपण ‘एलआयसी आधार शिला पॉलिसी’चे वैशिष्ट्य आणि फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

मृत्यू लाभ

एलआयसीची ही योजना मृत्यूलाबही देते. जर समजा एलआयसी पॉलिसीच्या मुदती दरम्यान सदर विमाधारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसी धारकाच्या कुटुंबातील सदस्यांना देय आहे. तसेच जर सदर पॉलिसीधारकाचा पॉलिसी मुदतीमध्येच पहिल्या 5 वर्षांत मृत्यू झाला तर, मृत्यूवरील विमा रक्कम त्यांच्या लाभार्थीला देय असते. त्याचबरोबर  पॉलिसीधारकाचा मृत्यू 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मात्र मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी झाला असल्यास मृत्यूवरील विम्याची रक्कम व लॉयल्टी ॲडिशन, जर असल्यास दिले जाते.   

मॅच्युरिटी बेनिफिट्स

आता या योजनेचे मॅच्युरिटी बेनिफिट्स आपण पाहणार आहोत. तर या योजनेत सहभागी महिलांना मच्युरिटी बेनिफिट्सची रक्कम प्रदान करण्यात येते. जी पॉलिसी टर्मच्या समाप्तीपर्यंत विमाधारकास देण्यात येते.  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now
लॉयल्टी ॲडिशन्स 

तसेच एलआयसी कंपनी आपल्या ग्राहकांना लॉयल्टी ॲडिशन्स पॉइंट देखील देते. या लाभाचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांनी या योजनेत किमान 5 वर्षे पूर्ण केली असावीत. तर किमान 5 वर्षांचा प्रीमियम परिश्रमपूर्वक भरला असला पाहिजे. 

कर्ज सुविधा

तसेच एलआयसी पॉलिसीच्या या ‘LIC आधार शिला पॉलिसी’च्या मुदतीदरम्यान कर्ज सुविधेचा ग्राहक लाभ घेऊ शकतात. ग्राहकांना हा लाभ घेण्यासाठी पॉलिसीने समर्पण मूल्य प्राप्त केले असावे. ज्यामध्ये पॉलिसी कर्जासाठी आकारले जाणारे व्याजदर व कर्जाच्या संपूर्ण मुदतीसाठी लागू होणारे व्याजदर नियतकालिक अंतराने निर्धारित केले जाते. सरेंडर व्हॅल्यूची टक्केवारी म्हणून कमाल कर्ज लागू पॉलिसींसाठी – 90% पर्यंत असेल. तर पेड-अप पॉलिसींसाठी – 80% पर्यंत असेल.

एलआयसी आधार शिला पॉलिसी’चे पात्रता आणि निकष 

एलआयसी आधारशीला पॉलिसीमध्ये किमान 75 हजार रुपये रक्कम तर कमाल 3 लाख रुपये इतकी गुंतवणूक करू शकता. 

या योजनेत प्रवेश करण्याचे वय आठ वर्षे ते 55 वर्षे इतके आहे. 

याया प या पॉलिसीचे टर्म 10 वर्षे ते 20 वर्षे इतकी आहे. 

तसेच परिपक्वतेचे वय 70 वर्षे इतके आहे. 

प्रीमियम भरण्याची पद्धत मासिक, सहामाही, त्रैमासिक आणि वार्षिक आहे. 

Leave a comment