बँक ऑफ इंडियाकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचंय? तर पाहा आवश्यक कागदपत्रे आणि व्याजदर | Bank of India Personal Loan

आताच्या काळात पैशाला खूप किंमत आहे. कारण पैसा आहे तरचं सगळं काही आहे. पण आताच्या युगात पैसा कमावणे तितका सोपंही राहिलेलं नाही. तसेच कमी पैशाच्या नोकरीतून घर किंवा व्यवसायाचा सुद्धा कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांना बँकेची मदत घ्यावी लागते. म्हणजेच बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. परंतु तुम्हाला माहित आहे का कर्ज घेणेदेखील सोपी गोष्ट नाही. यासाठी बँकेच्या काही अटी शर्ती पूर्ण कराव्या लागतात. तेव्हा कुठे बँकही तुम्हाला कर्ज देते. आज आपण बँकेच्या कर्जाबाबतच माहिती जाणून घेणार आहोत. 

bank of india personal loan

बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्ज Bank of India Personal Loan 

आता बँक म्हटलं की, सर्वसाधारण लोकांचे मोठ्या प्रमाणात बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असते. याचमुळे आपण बँक ऑफ इंडिया मधून वैयक्तिक कर्ज कशाप्रकारे घेता येईल याची माहिती पाहूयात. तसेच बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी काय कागदपत्रे लागतात तसेच काय अटी शर्ती पूर्ण कराव्या लागतात याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

बँक ऑफ इंडियाकडून कर्ज का घ्यावे?  Why take a loan from Bank of India? 

सर्वप्रथम बँक ऑफ इंडिया कडून कर्ज का घ्यायचे हे पाहुयात. खरंतर बँक ऑफ इंडियाचे कर्जासाठी ची कागदपत्रे अगदी सोपी आहे. तुम्ही लाखांमध्ये कर्ज घेतलं तरी तुम्हाला कमीत कमी कर्जाचा हप्ता भरता येतो. तसेच कोणत्याही हमीशिवाय देखील या बँकेत कर्ज मिळते. इतकच नाही तर तुम्ही एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज या बँकेकडून घेऊ शकता. तसेच महिलांना कर्ज घेतलं तर त्यांना 0.50 टक्के व्याजदरात सूट मिळते.  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतल्याचे फायदे काय? What are the benefits of taking a loan from Bank of India? 

बाजारात स्पर्धात्मक प्रक्रिया शुल्क आकारले जाते. तसेच या बँकेत कमी आकारण्यात येते.

10.85% पी.ए. पासून कमी दर व्याज सुरू होते.

रु. 25.00 लाख पर्यंत कमाल मर्यादा आहे.

कुठलेही छुपे शुल्क नाही. 

तसेच प्रीपेमेंट पेनल्टी देखील नाही. 

बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेण्यासाठी पात्रता Eligibility for taking loan from Bank of India 

तुम्हाला बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेण्यासाठी नेमकी काय पात्रता लागते याबाबतची माहिती पाहूयात. 

कोणत्याही पगारदार, स्वयंरजगार तसेच व्यावसायिक व्यक्तीला या बँकेकडून कर्ज मिळते. 

तसेच गैर-व्यक्ती अविश्वासू या कारणासाठी पात्र राहणार नाही. 

तसेच स्थायी लोक आणि कायम कर्मचाऱ्यांचा गट असणारे लोक देखील या बँकेकडून कर्ज घेऊ शकतात.

वय: अंतिम परतफेडीच्या वेळी कमाल वय 70 वर्षे असणे आवश्यक आहे. 

बँक ऑफ इंडियाचे वैयक्तिक कर्ज आणि व्याजदर शुल्क Bank of India Personal Loan and Interest Rate Charges  

आरओआई सिबिल वैयक्तिक स्कोअरशी जोडलेला असावा अशा व्यक्तीला 10.85% पासून व्याजदर सुरू होतो.

तसेच आरओआयची गणना दररोज कमी शिल्लक वर केली जाते. 

बँक ऑफ इंडियाकडून वैयक्तिक कर्जसाठी किती शुल्क आकारण्यात येते? How much does Bank of India charge for personal loans? 

पी.पी.सी. व्यक्तींसाठी:

एक वेळ @2.00% कर्जाची रक्कम: किमान रु. 1000/- ते कमाल रु. 10000 /-

डॉक्टरांसाठी पी.पी.सी.:

व्यक्तींसाठी लागू असलेल्या शुल्काच्या 50%

मंजूर योजनांसाठी आकर्षक सवलती

बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? What documents are required for Bank of India personal loan? 

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा ओळखीचा कोणताही एक पुरावा हवा जसे की, पॅन / पासपोर्ट / चालक परवाना / मतदार ओळखपत्र

तसेच कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा कायमचा पत्त्याचा पुरावा हवा. (पासपोर्ट/चालक परवाना/आधार कार्ड/ नवीनतम वीजबिल/नवीनतम टेलिफोन बिल/नवीनतम पाईप गॅस बिल) 

तसेच या व्यक्तीला उत्पन्नाचा पुरावा देखील द्यावा लागेल. ( पगारदार लोक नवीनतम 6 महिन्यांचा पगार / वेतन स्लिप आणि एक वर्ष आयटीआर / फॉर्म 16 देऊ शकतात. तसेच

स्वयंरोजगारासाठी: सीए प्रमाणित आयकर / नफा आणि तोटा खाते / ताळेबंद / भांडवल खाते स्टेटमेंटसह मागील 3 वर्षांचा आय.टी.आर.)

2 thoughts on “बँक ऑफ इंडियाकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचंय? तर पाहा आवश्यक कागदपत्रे आणि व्याजदर | Bank of India Personal Loan”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top