जमीन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी ही अत्यंक महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. जमीन खरेदी करताना अनेकदा गैरव्यवहार होतात. बरेचदा जमीन विक्री करण्यासाठी आलेली व्यक्ती पैसे घेऊन निघून जाते आणि नंतर कळते की ती जमीन त्याची नव्हतीच किंवा ती जमीन सरकारच्या मालकीची होती. अशावेळी खरेदीदार व्यक्तीचे खूप आर्थिक नुकसान होते. म्हणूनच आम्ही आज लँड रजीस्ट्री कशी ओळखायची याची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Land registry
Table of Contents
जमिनीची जुनी नोंदणी कागदपत्रे तपासा
तुम्ही खरेदी करु इच्छित असलेल्या जमिनीची जुनी नोंदणी कागदपत्रे आवर्जुन तपासा. त्यामध्ये ती जमीन आधी कोणा कोणाच्या नावे होती, याआधी त्या जमिनीसंदर्भात कोणाकोणामध्ये व्यवहार झालेला आहे या सर्व गोष्टींची माहिती असते. तसेच जमिनीच्या व्यवहारासंबंधी जुनी कागदपत्रे म्हणजेच खरेदी खत, सातबारा, उतारा 8 अ ही सर्व कागदपत्रे तपासणे अत्यंत आवश्यक ठरते. कारण या कागदपत्रांवरूनच मूळ मालकाची माहिती मिळते. Land registry
सरकारी जमीन खरेदी करणे टाळा
जमीन खरेदी करण्याची कितीही इच्छा असली तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी जमीन खरेदी करणे टाळा. कारण त्यावरून कालांतराने मोठ नुकसान होऊ शकते. ती जमीन सरकारी आहे की नाही हे तपासण्यासाठी एकत्रीकरण रेकॉर्ड 41 आणि 45 वर तुम्हाला पहावे लागेल. Land registry
कायदेशीर सल्लागाराची मदत घ्या
तुम्हाली जमिनीच्या कागदपत्रांसंबंधी काही माहिती नसेल किंवा हे कागदपत्रं कसे वाचायचे ते कळत नसेल तर जमिनीसंबंधीत कायदेशीर माहिती असलेल्या सल्लागाराकडून मदत जरुर घ्या,
जमीन खरेदीचा कोणताही व्यवहार सर्व कागदपत्रे आणि नियम तपासूनच करावा. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. Land registry