जमीन खरेदी करताना अशाप्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक. सावधान!!

अलीकडेच एक घटना ऐकण्यात आली की एकाच वावराचे चार वेळा खरेदी झाले आणि पाचव्यांदा विकण्यासाठीचे जाहीर प्रकटन करण्यात आले हे असे कसे होऊ शकते ? यासाठी फसवणुकीचे काय मार्ग आहेत ? व त्यावर कसा बचाव करू शकतो? यासंबंधी सविस्तर माहिती पाहू.

Land Purchase Precautions
Land Purchase Precautions

फसणुकीच्या पद्धती

1) बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यक्ती-

व्यवहाराच्या वेळी अनेकदा बनावट कागदपत्र सादर केले जाते आणि खोट्या व्यक्तींना उभे केले जाते परंतु प्रत्यक्ष जमीन व्यवहाराच्या वेळी आपल्या लक्षात येते की मूळ मालक आणि आणि व्यवहार करणारा यामध्ये तफावत आढळून येते आपल्याला समजते की आपली फसवणूक झालेली आहे.

2) एकच जमीन अनेकांना विकणे-

जेव्हा आपण जमिनीत खरेदी करतो त्यावेळी जमिनीचे खरेदीखत रजिस्टर केले जाते आणि सातबारा उताऱ्यावर केली जाते या बदलासाठी तीन ते चार महिने सहज लागतात परंतु या कालावधीतच जमिनीचा मूळ मालक रजिस्टर जमीन खत वापरून इतरांना विकू शकतो अशावेळी आपण सहज बसू शकतो.

3) इसार एकाचा आणि विक्री वेगळ्यालाच-

इसार म्हणजेच जमीन खरेदी करताना काही रक्कम आधी देऊ केली जाते आणि नंतर पूर्ण पैसे दिले जाते व जमिनीचा व्यवहार पूर्ण केला जातो. अशी पद्धत असते परंतु अनेकदा सार दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या व्यक्तीने जास्त पैसे देऊ केल्यामुळे मूळ मालक दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार करतो आणि तो रजिस्टर खरेदीखतद्वारे पूर्ण करून टाकतो. यामध्ये इसार दिलेल्या व्यक्तीची फसवणूक होते.

4) गहाण ठेवलेल्या जमिनीची विक्री-

जमिनीचा मूळ मालक त्याची जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतो आणि ते कर्ज सातबारा उताऱ्यावर नोंद होण्यापूर्वी विक्री करत असेल तर जमीन घेणाऱ्याची फसवणूक होते.

5) वारसदारांच्या हरकती-

जमीन मालकाच्या मृत्यूनंतर सातबारा उताऱ्यावर त्याच्या मुलांची नावे लागलेली असतात. बऱ्याचदा मुलींची किंवा इतर वारसांची नावे दिसत नाहीत . अशावेळी तुम्ही अशी जमीन खरेदी असाल तर ती जमीन खरेदी करू नये त्याचा उपयोग होत नाही. कारण त्या जमीन मालकाच्या मुलीनी कोर्टात खटला चालवल्यास हे प्रकरण संपुष्टात येण्यासाठी बरीच वर्ष खर्ची घालावी लागू शकतात.

फसवणूक टाळण्याचे उपाय

1) च्या गावामध्ये जमीन खरेदी करायची आहे त्या गावांमध्ये सातबारा उतारा 8अ नकाशा या गोष्टी तपासून पाहायच्या.

2) सातबारा उताऱ्यावर विक्री करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत का  हे तपासणे.त्यावर मृत्यू झालेल्या व्यक्ती किंवा जुना मालक यांची नावे असल्यास ती काढून घेणे आवश्यक आहे.

3) जी जमीन घेणार आहोत त्यावर कोणत्याही बँक किंवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नाही ना याची खात्री करून घेणे . तसेच त्यावर खटला चालू आहे का? यासंबंधीचा संदर्भात तपासून पाहणे.

4) आपण खरेदी करत असलेल्या शेत जमिनीमधून रस्ता महामार्ग इत्यादी नाही ना याची खात्री करून घ्यावी व याची नोंद सातबारा उताऱ्यावर आहे का ते पाहणे.

5) सातबारा उतारा मध्ये भूधारणा पद्धतीसमोर काय नोंदवले हे पाहणे. जर त्यासमोर भोगवटादार वर्ग १ आहे अशी नोंद केली असेल तो मालक त्या जमिनीचा असतो. त्या जमिनीवर शासनाची काहीही निर्बंध नसतात.

 जर का भोगवटदार  वर्ग २ असे नमूद केले असेल तर शासनाच्या परवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतरण केले जात नाही.

6) आपल्याला ज्या गटातील जमीन खरेदी करायची आहे त्या गटाचा नकाशा पाहणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला जमिनीची हद्द समजते. त्याच सोबत चतुर सीमा कळते. म्हणजेच त्या जमिनीच्या चारी बाजूला कोणते गट नंबर आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत हे समजते.

या प्रकारे आपण जमीन खरेदी करताना काळजी घेतली तर फसवणुकीपासून वाचू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top