तुमच्याकडे जर जमीन असेल तर हे सात पुरावे नक्की जवळ ठेवा! 

आजकाल मालकी हक्काविषयी वाद सुरू असल्याचे दिसून येतात. एवढेच नव्हे तर राज्यभरात असे हजारो खटले ही प्रलंबित आहेत. त्यामुळे आपण जी जमीन कसतो किंवा ज्या जमिनीवर आपली स्थावर मालमत्ता घर किंवा व्यवसायाची इमारत आहे. ती जमीन आपल्याच मालकीची आहे हे पटवून देण्यासाठी काही पुराव्यांचे जतन करून ठेवणं खूप गरजेचं असते. असे नेमके कोणते पुरावे आहेत त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत.

Land Purchase Documents
Land Purchase Documents

1) खरेदी खत

खरेदीखत म्हणजे काय? तर ज्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो. त्यांना जमिनीच्या मूळ मालक सिद्ध करण्यासाठी खरेदी खत आवश्यक आहे खरेदीखत  हे एक सरकारी कागदपत्र असते.खरेदी खत हे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जा. या खरेदी खतामध्ये काय असतं? तर ज्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार होणार आहे हे दोन व्यक्तींची नावे व किती तारखेला, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांमध्ये तो व्यवहार झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते. आता सरकारने 1985 पासूनचे खरेदीखत आणि जुने दस्त ऑनलाइन उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे .

2)सातबारा उतारा

जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा होय. या  उताऱ्यात दोन गाव नमुने असतात- 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now
  • गाव नमुना 7 :  गाव नमुना 7 मध्ये जमिनीच्या मालका विषयाची माहिती दिली असते.
  •  गाव नमुना 12 :तर गाव नमुना 12 मध्ये पिकांची सर्व नोंदणी असते म्हणजे त्या जमिनीवर कोणते पिकं घेतले आहे माहिती दिलेली असते.

आता हा जो गाव नमुना 7 आहे त्यात भोगवटदाराची पद्धत नमूद केली असते. यावरून जमिनीचा खरा मालक कोण त्याची ओळख होते.  याच्या ज्या  पद्धती आहे त्याचे एकूण चार प्रकार पडतात.ते खालीलप्रमाणे :- 

  • भोगवटदार वर्ग 1 : अशा प्रकारच्या जमिनी समाविष्ट असतात ज्याचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात .शेतकरीच हा त्या जमिनीचा मालक असतो.
  • भोगवटदार वर्ग 2 : यामधील जमीनींचे  हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात. सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचा हस्तांतरण करता येत नाही.
  • भोगवटदार वर्ग 3 :  यामध्ये  सरकारी प्रवर्गात मोडणाऱ्या जमिनी येतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
  • भोगवटदार वर्ग 4 : ‘ सरकारी पट्टेदार ‘ या जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10,30,50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातात. 

3)खाते उतारा किंवा 8-अ

एखाद्या शेतकऱ्याची जमीन वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते. हे सर्व एकत्र आठ ए मध्ये दिलेले असते. एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे, त्याची माहिती मिळते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8- अ उतारा किंवा खाते उतारा हा महत्त्वाचा पुरावा मानला जा. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने 1ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8- अ उतारा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही दरवर्षी अपडेटेड खाते उतारा डाऊनलोड करू शकता.

 4)जमिनीच्या मालकीचे नकाशे

एखाद्या जमिनी संदर्भात जर का वाद उद्भवला आणि त्यावेळी तुमच्याकडे जर जमिनीचा नकाशा असल्यास तुम्ही त्या जमिनीवर मालक्या प्रस्थापित करू शकता. त्यामुळे जमिनीचे मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असते.एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती या नकाशाद्वारे मिळते. तसेच तुमच्या शेताला लागून कोणता गट क्रमांक आहे म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याची जमीन आहे याची माहिती दिलेली  त्यामुळे गट नकाशा किंवा शेताच्या जमिनीचा नकाशा हा जमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा ठरतो.

5)जमीन महसुलाच्या पावत्या

जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत महसूल भरल्याची पावती दिली जाते. त्याचा सुद्धा जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.

6)जमिनीसंबधीचे पूर्वीचे खटले

जर तुमच्या मालकीच्या जमीन असेल आणि त्या जमिनीवर यापूर्वी एखादी केस किंवा खटला चालू असेल, तर त्या केस संदर्भातली कागदपत्र,जबाबाच्या प्रती आणि निकाल पत्रक जपून ठेवणे गरजेचे असतात. वेळप्रसंगी किंवा काही अडचण आल्यास ही सगळी कागदपत्र तुम्हाला जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून किंवा जमिनीवर मालकी हक्काचा दावा ठोकण्यासाठी पुरावा म्हणून वापरता येते.

7) प्रॉपर्टी कार्ड

जर बिगर शेत जमीन क्षेत्रावर तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल म्हणजे घर असेल किंवा व्यवसायाची इमारत असेल, तर ती तुमच्याच मालकीच्या हे सिद्ध करणारा महत्त्वाचा सरकारी पुरावा  म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड . या प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेत जमिनीवर घराची किंवा व्यवसायाची किती क्षेत्रावर कोणत्या व्यक्तीची इमारत आहे. याची माहिती दिली असते. त्यामुळे बिगर शेत जमीन क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड बघितले जाते.

 8)घरपट्टी पावती

बिगर जमीन क्षेत्रात तुमचं घर असेल तर घरपट्टी भरल्याच्या पावत्याही तुम्ही जपून ठेवू शकता वेळप्रसंगी त्यांचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.

अशा प्रकारे  जमीन आपल्याच मालकीची आहे हे पटवून देण्यासाठी काही पुराव्यांचे जतन करून ठेवणं खूप गरजेचं असते.वेळप्रसंगी ही सगळी कागदपत्रे तुम्हाला जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून किंवा जमिनीवर मालकी हक्काचा दावा ठोकण्यासाठी पुरावा म्हणून वापरता येतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top