मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत गैरव्यवहार झाल्यास सेतू केंद्रांचे परवाने होणार रद्द; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली. या योजनेची आर्थिक तरतूद यावर्षीच्या आर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याप्रमाणे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी, सेतू केंद्रे, अंगणवाडी सेविका यांना देण्यात आली आहे. यासंदर्भाच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. ही नेमकी कोणती घेषणा आहे आपण या लेखाच्या माध्यमांतून जाणून घेऊ. Ladki Bahin Yojana Update

ladki bahin yojana update
ladki bahin yojana update

सेतू केंद्रांना प्रत्येक फॉर्ममागे मिळणार 50 रुपये  

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या सेतू केंद्रांवर महिलांकडून फॉर्म भरवुन घेतले जात आहेत, त्या ठिकाणी सेतू केंद्रांना प्रत्येक फॉर्ममागे 50 रुपये दिले जाणार आहेत. हे त्या केंद्रांचे प्रक्रिया शुल्क असणार आहे. तसेच शासनाकडून या योजनेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकचे मानधन देखील दिले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Majhi Ladaki Bahin Yojana

जास्तीचे पैसे मागितल्यास होणार कडक कारवाई

सेतू केंद्रांवर किंवा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिला अर्जदारांचे फॉर्म भरुन घेताना जास्तीच्या पैशांची मागणी केल्यास कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होणार कडक कारवाई. तसेच त्या अधिकाऱ्यांचे निलंबन देखील होऊ शकते असे कडक शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितले आहे. त्याप्रमाणे गृहविभागाला आदेश देण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक असलेल्या महिला लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यास सेतू केंद्रांवर गेले असता त्यांच्याकडून पैशांची मागणी झाल्यास कोणत्याही प्रकारचा शुल्क देऊ नसे ही बाब त्यांना सांगा, एखादा शासकीय अधिकारी या योजनेसाठी पैसे घेत असल्यास त्याची तक्रार पोलिस विभागात करणे आवश्यक असेल. Majhi Ladaki Bahin Yojana

बदल आणि तरतुदी ऐकायला मिळतात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नव्याने या योजनेसंबंधीत घोषणा करीत आहे. काही वेळा योजनेच्या नियमांमध्ये सुविधाजनक बदल करण्यात येतात तर कधी कधी योजनेसाठी अर्ज करण्याच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येते. यावेळी नव्याने एक घोषणा समोर येत आहे त्याबद्दल आपण या लेखाच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवू. Ladaki bahin yojana update

फॉर्म भरण्यास उशीर झाला असेल तरी काळजी नको

अनेकदा सेतू केंद्र किंवा सिएससी केंद्रंवर गर्दी असल्याने अनेक महिलांचे अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठीचे अर्ज करणे बाकी आहे. ज्यांचे अर्ज करणे बाकी आहे त्या महिला चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहेत. योजनेसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट असून असे सांगण्यात येत आहे की, दिनांक 15 ऑगस्ट 2024 पासूनच लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. असे असताना ज्या महिलांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी ऑगस्टमध्ये जरी अर्ज केलेला असला तरी त्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. Ladaki bahin yojana update

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

नारीशक्ती या मोबाईल ऍपवरुन करता येणार अर्ज

ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करताना महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी मोबाईल ऍपच्यामाध्यमातून देखील योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा शासनाने सुरु केली आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नारीशक्ती या महाराष्ट्र शासनाच्या मोबाईल ऍपच्या मदतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करु शकणार आहात. Ladaki bahin yojana update

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top