केंद्र व राज्य सरकारचे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बँका आपापल्या शुल्कांविषयीच्या नियमांमध्ये बदल करीत असतात. यावेळी तर भारतातील बँकांनी त्यांच्या क्रेडीट कार्ड संबंधिक नियमांमध्ये बदल केले आहेत. भारतातील बँकिंग सुविधा डिजिटलाईज होत आहे, त्यात क्रेडीट कार्ड सारख्या सुविधा ग्राहकांना मिळत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक आनंदाने ही सुविधा उपभोगतात आणि त्यांना हवे असलेले खर्च या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून पुर्ण करतात. अनेकदा या क्रेडीट कार्डच्या वापरावर ग्राहाकंना विविध बोनस पॉईंट, कॅशबॅक सारख्या अधिकच्या सुविधा देखील मिळत असतात. परंतु यावेळी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच काही बँकांनी त्यांच्या क्रेडीट कार्ड सुविधांमध्ये बदल केला आहे. चाला पाहूया यामध्ये तुम्ही वापरत असलेल्या क्रेडीट कार्डची बँक तर नाही ना?
Credit Card News
SBI क्रेडीट कार्ड धारकांसाठी
SBI ही सार्वजनिक क्षेत्रातील भारताची सर्वात मोठी बँक आहे. ही बँक ग्राहकांना विविध वित्तीय सेवा पुरवते. यावेळी या बँकेने दिनांक 1 जुलै 2024 पासून SBI क्रेडीट धारकांना कोणत्याही प्रकराच्या शासकीय व्यवहारांवर क्रेडीट पॉईंट मिळणार नाहीत.
सिटी बँक क्रेडीट कार्ड धारकांसाठी
Axis बँकेने सिटी बँकेच्या क्रेडीट कार्डधारकांना 15 जुलै 2024 पर्यंत स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. ही माहिती बँकेने क्रेडीट कार्ड धारकांना इमेल द्वारे कळवली आहे.
HDFC बँक क्रेडीट कार्ड धारकांसाठी
दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून HDFC बँकेने त्यांच्या क्रेडीट कार्ड धारकांसाठी नियम बदलले आहेत. Cred, Paytm, Cheq, Mobikwik आणि Freecharge या फ्लॅटफॉर्मत्या मदतीने कोणतेही ऑनलाईन आर्थिक व्यवहार केल्यास जादाचे शुल्क भरावे लागणार आहेत.
ICICI बँक क्रेडीट कार्ड धारकांसाठी
ICICI कार्ड धारकांना कार्ड बदलण्यासाठी यापुढे 100 ऐवजी 200 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. चेक आणि कॅश पिकअपवरील 100 रुपयांचे शुल्क यापुढे बंद होणार आहे. चार्ज स्लिप विनंतीवर 100 रुपये आकारण्याचे बँकेने बंद केले आहे. चेक व्हॅल्यूवर 1% शुल्क म्हणजेच 100 रु न घेण्याचा देखील निर्णय ICICI बँकेने घेतला आहे.