खरेदीखत म्हणजे काय? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती जाणून घ्या!

आज काल ग्रामिण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये जमिनींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जमिनीतून वाद निर्माण होताना देखील आपण पाहत असतो. अशावेळी एक शब्द कानावर येतो तो म्हणते खरेदीखत. हे खरेदी खत म्हणजे नेमके काय आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात. हे आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

kharedi-khat

खरेदी खत म्हणजे काय?

जमीन खरेदी विक्री संबंधी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे खरेदी खत. खरेदी खत नवावर नसेल जमिनीवर मालकी हक्क सांगता येत नाही. एखाद्या जमिनीचा सौदा झाल्यानंतर खरेदीदाराने संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण केल्यानंतर सर्वप्रथम खरेदीखतासाठी मुद्रांकशुल्क काढून घ्यावे लागते. या करिता ज्या गावभागामध्ये जमीन आहे त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मुद्रांकशुल्क काढून घेणे गरजेचे असते. दुय्यम निबंधक हा मूल्यांकशुल्क काढून देण्याचे काम करतो. त्यानुसार जमिनीचे खरेदी खत बनते. त्यानंतर जमीन विकत घेणारी व्यक्ती त्या जमिनीचा मालक होते. आणि जमीन विकणाऱ्या व्यक्तीचा जमिनीवर कोणताही अधिकार राहत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खरेदीखत तयार करण्याआधी ठरलेली रक्कम खरेदीदाराकडून जमीन विक्री करणाऱ्याने घ्यावी असे म्हटले जाते.

खरेदीखत बनविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

खरेदीखत तयार करण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.

·      जमिनीचा 7/12 उतारा

·      जमिनीचा 8 अ

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

·      मुद्रांक शुल्काची पावती

·      प्रतिज्ञापत्र

·      फेरफार

·      दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो

·      NA ऑर्डर ची प्रत

वरील सर्व कागदपत्रे जोडून याबरोबर डाटा एन्ट्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी साठी सदर करावा लागतो.

खरेदीखताचा पुरावा कुठे वापरता येतो?

जमिनीसंबंधीत न्यायालयात खटला सुरु असल्यास  जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी खरेदीखत हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरतो. जमिनीच्या खरेदीखतामध्ये खरेदी विक्री करणाऱ्याचे नाव. व्यवहार कोणत्या तारखेस झाला ती तारीख, पेमेंटचे डिटेल्स, कागदपत्रांची माहिती या सर्व बाबींचा समावेश असतो. खरेदी खत हे प्लॉट, जमिन, घर या सर्व मालमत्तासाठी बनविण्यात येते. यामध्ये आर्थिक व्यवहाराचा समावेश असल्याने खरेदीखताला अत्यंत महत्त्व आहे.

तुम्ही देखील तुमच्या जमिनीचे खरेदीखत तपासून घ्या. तसेच कोणतीही जमीन, घर किंवा प्लॉट खरेदी करताना जमिनीसंबंधीत योग्य माहिती मिळवा आणि जमिनीचे खरेदी खत तपासायला विसरु नका.  त्यामध्ये तुम्हाला जमिनीच्या मालकाची सर्व माहिती असेल. तुम्ही खरेदी खत वाचण्यास असमर्थ असल्यास तुम्ही मालमत्ता संबंधीत वकिलांची मदत घेऊ शकता. —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top