अबब ! 9 महिन्यात 63% पेक्षा अधिक रिटर्न्स ’या’ इक्विटी म्युच्युअल फंडात! गुंतवणूक करणारे झाले मालामाल.
Top Mutual Fund | लोकांमध्ये आजकाल शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याची चांगलीच क्रेझ वाढली आहे. पैसे दुप्पट करण्याचे हे एक चांगले साधन बनले आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून देशात शेअर मार्केट खूप चांगले चालत आहे. या काळात लोकांचे पैसे दुप्पट तिप्पट झाले आहेत. त्याचवेळी शेअर मार्केट चांगले चालत असल्यामुळे त्याचा फायदा थेट इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना झाला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे, अशा गुंतवणूकदारांना गेल्या नऊ महिन्यांमध्ये तब्बल 63 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.
टॉप 3 परफॉर्मिंग फंड कोणते?
जा गुंतवणूकदारांनी सध्याच्या टॉप परफॉर्मिंग फंडात गुंतवणूक केली असेल असे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. कारण पहिल्या क्रमांकावर या फंडातील क्वांट व्हॅल्यू फंड आघाडीवर आहे. या फंडाने 63.81 टक्के असा जबरदस्त परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. या फंडा नंतर जबरदस्त पतावा देणारा फंड आयटीआय मिडकॅप फंड आहे. या फंडाने 60.27 टक्के परतावा दिला आहे. हा फंड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोणत्या फंडांनी दिला जबरदस्त परतावा?
मोतीलाल ओसवाल मेडकॅप या फंडाने देखील गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देऊन तिसरा क्रमांक मिळवला आहे. या फंडाने 54.92 टक्के असा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. त्याचबरोबर इन्वेस्को इंडिया फोकस्ड फंडाने देखील गुंतवणूकदारांना 54.86 टक्के इतका परतावा दिला आहे. तर बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाने देखील गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या फंडाने 54.86 टक्के परतावा दिला आहे. तर दुसरीकडे क्वांट लार्ज अँड मिड कॅप या फंडाने गुंतवणूकदारांना 53.52 टक्के परतावा दिला आहे.
कोणत्या इक्विटी म्युच्युअल फंडात 50 टक्क्यांनी अधिक परतावा मिळाला?
आता आपण कोणत्या म्युच्युअल फंडात 50 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे याची यादी पाहुयात.
क्वांट व्हॅल्यू फंड : 63.81%
आयटीआय मिडकॅप फंड: 60.27 टक्के
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड: 54.92%
इनवेस्को इंडिया फोकस्ड फंड: 54.86%
बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंड : 53.83%
क्वांट लार्ज अँड मिड कॅप फंड 53.52%
जेएम फ्लेक्सीकॅप फंड: 53.30%
क्वांट फ्लेक्सी कॅप फंड 52.23%
क्वांट मिड कॅप फंड : 51.76%
आयटीआय स्मॉल कॅप फंड: 50.75%
जेएम मिडकॅप फंड: 50.38%
बंधन स्मॉल कॅप फंड 50.37%
एडलवाइज मिडकॅप फंड: 50.10%
एनजे फ्लेक्सी कॅप फंड : 50.05%
Post Comment