TATA च्या ‘या’ शेअरने थेट +5000% रिटर्न्स ! गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस! पहा कोणता आहे हा शेअर? 

Tata Share Price | लोकांमध्ये शेअर मार्केटबद्दल एक वेगळीच निर्माण झाले आहे. कारण दिवसेंदिवस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढत चालला आहे. गुंतवणूक करायची म्हटलं की विश्वासार्ह शेअर्स निवडणे महत्त्वाचे असते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा टाटा कंपनीकडे असतो. टाटांचा शेअर (Tata Share Price) डोळे झाकून गुंतवणूकदार खरेदी करतात. कारण टाटांच्या शेअरकडून गुंतवणूकदारांना दुप्पट तिप्पट फायदा होतो. ज्यावेळी विश्वासाचा प्रश्न येतो त्यावेळी लोक फक्त टाटांनाच आपले मत देतात. अशातच टाटा कंपनीच्या एका शेअरने (Share Market) गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया टाटाच्या कोणत्या कंपनीचा शेअर हा जबरदस्त परतावा देत आहे.

Tata Share Price
Tata Share Price

गुंतवणूकदारांना तब्बल 5 हजार टक्क्यांहून अधिक दिला परतावा

विश्वासार्ह कंपनी असणारी टाटाच्या (TATA Group) एका चरणी धडाकेबाज कामगारी केली आहे. याचा फायदा थेर गुंतवणूकदारांना होत आहे. मागच्या चार वर्षांमध्ये टाटाच्या या कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल 5000 टक्क्यांहून अधिकचा बडा परतावा दिला आहे. त्यावेळी या शेअरची किंमत केवळ अठरा रुपये इतकी होती. ती वाढून आता या शेअरची किंमत थेट 950 झाली आहे. विश्वासाच्या शर्यतीत असलेल्या टाटा कंपनीच्या शेअरने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या मनात आपल्याबद्दलचा विश्वास कायमचा रुजवला आहे. 

टाटा समूहाची ही कंपनी काय करते? 

टाटाच्या Automotive Stampings & Assemblies Ltd. या कंपनीच्या शेअर ने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअर बाजारावर या कंपनीचा कायमच दबदबा राहिला आहे. ऑटोमोटीव्ह स्टॅम्पिग्स पॅसेंजर व्हीकल नावाच्या या कंपनीचा शेअर 970.65 रुपयांवर बंद झाला होता. ही कंपनी कमर्शिअल वेहिकल आणि ट्रॅक्टरनिर्मितीसाठी शीट मेटल कंपनोनंटची निर्मिती करते. या कंपनीच्या शेअरची जोरदार विक्री होते.

कारण आता गुंतवणूकदारांचा या कंपनीवर अधिक विश्वास बसला आहे. कारण गेल्या चार वर्षात या कंपनीने जवळपास 5000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर अगदी अल्प दरात होता तो वाढून आता 950 रुपयांवर गेला आहे. यावरूनच लक्षात येते की गुंतवणूकदारांना ही कंपनी किती परतावा देत असेल. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा वाढणारा आकडा आणि TATA वर असलेला विश्वास या कंपनीला फायद्याचा ठरत आहे. 

Leave a comment