फक्त 2000 रुपयांची SIP आणि बना करोडपती; अधिक माहितीसाठी वाचा | SIP Investment

sip investment

आर्थिक नियोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक नियोजनाने आपण आपले भविष्य सुरक्षित करु शकतो. आधी आपण पैशांची बचत करताना FD, RD,PPF सारखे पर्याय निवडत असू. परंतु आता आर्थिक बचत आणि गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे SIP समजला जात आहे. परंतु आजही अनेकांना SIP म्हणजे काय हे माहिती नाही, तसेच या SIP मध्ये नक्की कशी गुंतवणूक करायची असते ते देखील माहिती नसते, म्हणूनच आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी छोट्या बचतीतून करोडपती बनण्याचा सोपा आणि खात्रीशीर पर्याय घेऊन आलो आहोत. SIP Investment

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही 500रुपयांपासून बचत सुरु करु शकता. कंपन्या गुंतवणूक दारांचे पैसे SIPच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने मार्केटमध्ये गुंतवतात. त्यामुळे गुंतवणूक दारांचे परतावे विशिष्ट पद्धतीने वाढत जातात. आज अनेक जण या SIP च्या मदतीने आनंदी जीवन जगत आहेत आणि आर्थिक व्यवस्थापन करुन भविष्यासाठी देखील पैसे बचत करीत आहेत. SIP Investment

अशी करा बचत आणि व्हा कोट्याधीश

गुंतवणूकदार SIPमध्ये कोणत्या वयापासून पैसे गुंतवत आहे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या वयाच्या 25 व्या वर्षापासून 2000 रुपयांची SIP केल्यास त्या व्यक्तीस दर महिना संपूर्ण वर्षभर 2000 रुपये बचत करायची असते, त्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्याच बचतीत 10% टक्क्याने वाढ केल्यास 2200 रुपये दर महिना असे वर्षभर बचत करावी.

असे 35 वर्षापर्यंत दरवर्षी 10% नी SIPची रक्कम वाढवत नेल्यास 12% व्याजासह तब्बल ₹1,29,90,538 इतकी रक्कम गुंतवणूक दाराच्या हाती येते. https://groww.in/calculators/sip-calculator या लिंकवर क्लिक करुन तुम्ही गुंतवणूक करु इच्छित असलेल्या रकमेचे कॅल्क्युलेशन करु शकता. तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करु इच्छित असाल तर आजच छोट्या रकमेपासून SIP करण्यास सुरुवात करा. SIP Investment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top