Sebi New Investment Plan: ‘सेबी’ चा नवीन गुंतवणूक प्रकार कोणता आहे जाणून घ्या!

SEBI म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही एक वैधानिक नियामक संस्था आहे जी भारत सरकारने 1992 मध्ये सिक्युरिटी मार्केटचे नियमन करण्याबरोबरच सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. सेबी ही संस्था एक नवीन मार्केट प्रॉडक्ट घेऊन येत आहे. ही नवी योजना म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) दरम्यान असेल. हे जे अधिक गुंतवणूक करू शकतात आणि जोखीमदेखील घेऊ शकतात अशा गुंतवणूकदारांसाठी सेबी संस्था हा गुंतवणूक प्रकार घेऊन आली आहे.

‘सेबी’चा नवीन गुंतवणूक प्रकार कोणासाठी असेल?

‘सेबी’ने अधिक परताव्यासाठी उच्च जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नवीन मालमत्ता वर्ग प्रस्तावित केला आहे. नवीन प्रस्तावित गुंतवणूक प्रकार म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवेतील मधला मार्ग असणार आहे.  म्युच्युअल फंड पेक्षा जास्त जोखीम घेण्याची क्षमता आहे, मात्र पीएमएस फंडामध्ये गुंतवणुकीसाठी ज्या गुंतवणूकदारांची पात्रता नाही त्यांच्यासाठी हा नवीन गुंतवणूक प्रकार सेबीने प्रस्तावित केला आहे.

म्युच्युअल फंड आणि पीएमएस मधील फरक

 म्युच्युअल फंड आणि पीएमएस हे दोन्ही गुंतवणूक  प्रकार आहेत परंतु यांमध्ये एक महत्त्वाचा फरक देखील आहे. म्युच्युअल फंडमध्ये  फक्त 500 रुपयांपासून SIP करता येते तर पीएमएसमध्ये गुंतवणुकीसाठी किमान 50 लाख रुपये अनिवार्य असतात.

किती गुंतवणूक करता येणार? 

सेबी या संस्थेने बाजारात आणलेल्या नवीन गुंतवणूक प्रकारामध्ये, कमीत कमी 10 लाखापर्यंत गुंतवणूक करुन त्यापुढे सुरु करता येणार आहे.  या नवीन गुंतवणूकीच्या प्रकारामध्ये रिस्क देखील मोठी असणार आहे. इतकेच नाही तर म्युच्युअल फंड किंवा मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना या जोखमीबाबत गुंतवणूकदारांना योग्य ती कल्पना देणे आवश्यक असणार आहे.  गुंतवणूकदारांना उच्च जोखीम घेण्याची क्षमता आणि मोठ्या रकमेवर गुंतवणूक उत्पादन प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.

किमान गुंतवणूक किती केली जाऊ शकते?

सेबी मार्फत नव्याने लागू करण्यात आलेल्या या गुंतवणूक प्रकारचा उद्देश असा आहे की, किरकोळ गुंतवणूकदारांना या उत्पादन प्रकारात सहभागी होण्यास प्रोत्साहीत करणे.  आणि 10 ते 50 लाख पर्यंत गुंतवणूक करण्यायोग्य अधिशेष असलेल्यांना आणि जोखीम घेऊ शकणाऱ्यांना आकर्षित करणे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

गुंतवणूकदारांना नवीन मालमत्ता वर्गांतर्गत धोरणांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी), सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (एसडब्ल्यूपी), आणि सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) सारखे पर्याय निवडण्याचा पर्याय असेल. गुंतवणुकीमध्ये सातत्य रहावे यासाठी  पैसे काढणे किंवा पद्धतशीर व्यवहार या मार्गातून गुंतवणूकदाराची एकूण गुंतवलेली रक्कम 10 लाख रुपयांच्या खाली जाऊ नये याची काळजी घेतली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top