Minor PAN Card – लहान मुलांना पॅन कार्ड ? ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा.

minor pan card

कागदपत्रे आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात. आधार कार्डप्रमाणे आता पॅन कार्ड देखील महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनले आहे. त्यामुळे आपल्या ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणून पॅन कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर आर्थिक कामांसाठी देखील पॅन कार्ड उपयुक्त असते. त्यामुळे आज लोकांना पॅन कार्ड काढणे ही महत्त्वाची गोष्ट बनली आहे. तसेच आपले पॅन कार्ड व्यवस्थित ठेवणेही गरजेचे आहे. विशेष म्हणजे पॅन कार्ड हे प्रौढ व्यक्तींसाठी गरजेचे असते त्याचप्रमाणे काही कारणांसाठी लहान मुलांसाठी देखील पॅन कार्ड गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊयात लहान मुलांसाठी पॅन कार्ड काढणे आवश्यक असते का? तसेच या पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा.  

लहान मुलांचे पॅन कार्ड काढता येते का?

minor PAN card काढण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही. त्यामुळे कोणीही पॅन कार्ड काढू शकते. आयकर विभागाच्या 160 कलमानुसार वयाची अट पॅन कार्डसाठी ठेवण्यात आली नाही. त्यामुळे अगदी लहान मुलांच्या पॅन कार्डसाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अगदी पाच वर्षांच्या मुलांचे देखील पॅन कार्ड काढता येते. त्याचबरोबर अल्पवयीन मुले स्वतःचे पॅन कार्ड काढू शकत नाहीत. याच कारणामुळे अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड काढण्यासाठी त्यांच्या पालकांना पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागतो. 

लहान मुलांना खरंच पॅन कार्ड आवश्यक असते का?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लहान मुलांना पॅन कार्ड ची गरज असते का? तर होय, ज्याचं कारण म्हणजे ज्यावेळी पालक आपल्याला लहान मुलांच्या नावावर गुंतवणूक करतात अशावेळी त्या लहान मुलाचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पालक अनेकदा लहान मुलांना त्यांच्या गुंतवणुकीवर नॉमिनी बनवतात. अशावेळी देखील लहान मुलांचे पॅन कार्ड असणे आवश्यक असते. त्याचबरोबर तुम्ही लहान मुलाचे जर बँक खाते उघडले तर त्यासाठी तुम्हाला पॅन कार्डचे तपशील द्यावे लागते. त्याचबरोबर तुम्ही जर लहान मुलीसाठी सुकन्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेसाठी देखील तुम्हाला त्या मुलीच्या पॅन कार्डची गरज भासते. 

अल्पवयीन मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करावा? 

तुम्हाला जर लहान मुलांचे पॅन कार्ड काढायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने पॅन कार्ड साठी अर्ज करू शकता. तसेच लहान मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी त्यांच्या पालकांना अर्ज करावा लागतो. सर्वप्रथम आपण ऑनलाइन पद्धतीने लहान मुलांच्या पॅन कार्डसाठी अर्ज कसा वापर करावा याची प्रक्रिया पाहूयात. 

सर्वप्रथम NSDL या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 49AA फॉर्म डाउनलोड करावा लागेल. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

या फॉर्मवर तुम्हाला अर्ज करणाऱ्या मुलाची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. 

 यानंतर तुम्हाला अल्पवयीन मुलाचा फोटो आहे महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. 

यानंतर पालकांची सही अपलोड करावी लागेल.

या प्रोसेस नंतर तुम्हाला पेमेंट टाकून अर्ज सबमिट करावा लागेल. 

तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक पावती क्रमांक देण्यात येईल.

अर्जाचे पडताळणी झाल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला कधीही पॅन कार्ड मिळेल. 

ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा? 

minor pan card साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट किंवा एनएसडीएल कार्यालयातून फॉर्म 49AA घ्यावा लागेल.

या फॉर्मवर अल्पवयीन मुलाची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. 

यानंतर अल्पवयीन मुलाचे दोन फोटो आणि त्यासह आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील. 

व्यवस्थित संपूर्ण फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून शुल्कासह तुमच्या जवळच्या NSDL कार्यालयात हा फॉर्म जमा करावा लागेल. 

अर्जाची व्यवस्थित पडताळणी करून तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचे पॅन कार्ड पाठवण्यात येईल. 

minor PAN card कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? 

अल्पवयीन मुलीच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा जसे की (आधार कार्ड / रेशन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार ओळखपत्र) 

पत्त्याचा पुरावा, जसे की (आधार कार्ड/पोस्ट ऑफिस पासबुक/ मालमत्ता नोंदणी दस्तऐवज / रहिवासी प्रमाणपत्र)  

Leave a comment