Real Estate Tips महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास मिळणार फायदाच फायदा; जाणून घ्या अधिक माहिती.

Real Estate Tips भारतात पुरुषप्रधान संस्कृती होती. आज आपण 21 व्या शतकात आहोत आणि आजही अनेक ठिकाणी महिलांना कमी लेखले जाते. घरातील प्रॉपर्टी असो किंवा मालमत्ता, जमीन यासारख्या गोष्टी घरातील मुलाच्या नावे असतात ना की मुलीच्या नावे. परंतु समाजातील ही मानसिकता बदलावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. महिलांच्या नावे प्रॉपर्टी असल्यास तिच्या नवऱ्यास किंवा कुटुंबियांना जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाही. चला तर मग पाहूया अशा कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही महिलांच्या नावे मालमत्ता घेऊन पैसे वाचवू शकता.

स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळवा

कोणतीही मालमत्ता खरेदी करताना किंवा घर खरेदी करताना आपल्याला आपल्याला त्यावर स्टँपड्युटी म्हणजेच मुद्राक शुल्क द्यावे लागते.   हे  मुद्रांक शुल्क साधारणपणे 6 ते 8 टक्क्यांपर्यंत शासनामार्फत आकारले जात असते.  मालमत्ता कर हा खरेदी केलेल्या मालमत्तेची किंमत किती आहे त्यानुसार ठरत असतो. मालमत्ता  महिलेच्या नावाने खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कामध्ये  1% पर्यंत सवलत  दिली जाते.  घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना सगळ्यात जास्त खर्च हा स्टँप ड्युटीवरच होतो तो खर्च भरपूर प्रमाणात वाचवता येतो. महिलांच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी करुन. Home Buying Tips

कर्ज  आणि व्याज दरामध्ये सवलत मिळवा

सध्या घर किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना कर्ज घेणे हा अत्यंत सोपा आणि सहज निवडता येणारा पर्याय आहे. घर खरेदी करताना का घर महिलेच्या नावाने खरेदी केल्यास बँकेतून कर्जाच्या व्याजावर सवलत मिळते. इतकेच काय बऱ्याच बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष कर्ज योजना देखील राबवतात.  महिलांना गृहकर्जावरील व्याजदर पुरुषांना मिळणाऱ्या व्याजदराच्या तुलनेत 0.20 ते 0.50% पर्यंत कमी असतो. कर्ज परतफेडीचा कालावधी देखील पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी जास्त असतो.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

सरकारी योजनांचा फायदा मिळवा

पंतप्रधान आवास योजना तसेच क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम यासारख्या  शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत करता येते.

करामध्ये सवलत मिळवा

पती पत्नी दोघांनी संयुक्तपणे प्रॉपर्टी खरेदी केली आणि प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर असेल तर त्यांना करामध्ये सवलत मिळण्यास मदत होते. कलम 80 C,24 आणि कलम 80 EE आणि 80 EEA अंतर्गत गृह कर्जाच्या परतफेडीवर तब्बल 1,50,000/- रुपयांपर्यंत कर सवलतीचा फायदा महिलांच्या मदतीने त्यांच्या पतीस  घेता येतो. Home Buying Tips

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top