स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारातातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ग्राहकांना आकर्षक योजनांच्या माध्यमातून बचतीची सवय लावणे हे SBI चे मुख्य उद्दिष्ट आहे. इतर बँकांपेक्षा ही बँक बचतीवर अधिक व्याजदर देते. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी नवनवीन योजनांची घोषणा SBI च्या माध्यमातून होत असते. शासकीय बँक असल्यामुळे ग्राहकांचा देखील या बँकेवर विश्वास असल्याचे दिसून येते. चला तर मग स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाविण्यपूर्ण योजनेबद्दल अधिक माहिती मिळवूया.
स्टेट बँकेची RD योजना
स्टेट बँकेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना बचतीची सवय लागावी यासाठी Recurring Deposit योजनेची सुरुवात करण्यात आली. या RD मध्ये अगदी 1000 रुपयांपासून ग्राहक त्यांचे पैसे बचत करु शकतात. चला तर मग पाहूया की, SBI त्यांच्या ग्राहकांना RD बचतीवर किती व्याज देते.
· 1 वर्षाच्या बचतीवर सर्वसामान्यांना 6.80% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30% व्याज दिले जाते.
· 2 वर्षाच्या बचतीवर सर्वसामान्यांना 7.00% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज दिले जाते.
· 3 ते 4 वर्षांच्या बचतीवर सर्वसामान्यांना 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.00% व्याज दिले जाते.
· 5 ते 10 वर्षांच्या बचतीवर सर्वसामान्यांना 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.00% व्याज दिले जाते.
अशी करा बचत
वरील तक्त्यामध्ये पाहिल्याप्रमाणे. ज्यामध्ये तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आवर्ती ठेव योजना म्हणजे RDमध्ये दरमहा 1,000 रुपयांची रक्कम जमा केली. ही रक्कम तुम्ही 5 वर्षांसाठी जमा केल्यास 60,000 रुपये रक्कम जमा होईल. ज्यावर बँक तुम्हाला 6.5 % व्याज देईल.म म्हणजेच जमा झालेल्या एकूण रकमेवर 10,989 रुपये इतके व्याज तुम्हाला मिळेल. म्हणजेच 11,000 रुपये तुमचा नफा झाला. एकत्रित पाहता पाच वर्षांच्या बचतीमधून तुम्हाला एकूण 70,989/- इकते रुपये मिळतील.
SBI RD योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये
SBI RD योजना हा एक सुरक्षित बचतीचा उत्तम पर्याय आहे, जो गुंतवणूकदारांना बचतीचे एक चांगले माध्यम प्रदान करतो. याद्वारे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी स्थिर आणि संरक्षित गुंतवणूक करू शकता आणि आर्थिक स्थिरता राखू शकता, त्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल चिंतित असाल आणि सुरक्षित बचतीचे योग्य माध्यम शोधत असाल, तर SBI RD योजना तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते.