पर्सनल लोन घेताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, अन्यथा नंतर करावा लागेल पश्चाताप | Personal Loan Tips

Personal Loan Tips – ज्यावेळी पैशांची खूप गरज भासते आणि पैसे मिळण्याचे सर्वच पर्याय बंद होतात. त्यावेळी व्यक्तीला कर्ज घ्यावे लागते. मग कर्ज (Loan ) घेण्यासाठी अनेक बँकांकडे किंवा फायनान्सकडे विचारणा केली जाते. अशाच प्रकारचे बँकेकडे मिळणारे एक पर्सनल लोन. आता ग्राहकांना बँकेकडे पर्सनल लोन (Personal Loan Tips) घेण्यासाठी कोणतेही तारण ठेवण्याची गरज नसते. त्यामुळे ग्राहकांना पर्सनल लोन घेणे सोयीचे आणि परवडणारे असते. कारण त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कारण किंवा घर घाण ठेवावे लागत नाही. म्हणून अनेक जण वैयक्तिक अडचणी पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन घेणे पसंत करतात. पण पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घ्यावी ही गोष्ट ही महत्त्वाची असते. आज आपण या लेखात पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. 

Personal Loan Tips
Personal Loan Tips

पर्सनल लोन घेताना व्याजदर तपासा | Check the interest rate while taking a personal loan

पर्सनल लोन हे इतर लोन पेक्षा थोडे महाग असतात. म्हणजेच पर्सनल लोन लोणचे व्याजदर हे इतर लोनपेक्षा 10 ते 24 टक्के अधिक असतात. त्याचबरोबर तुमचा व्याजदर जितका जास्त असेल तितकाच तुमचा ईएमआय देखील जास्त असतो. अशा परिस्थितीत, सर्वात प्रथम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे पर्सनल लोन त्या बँकेतून घ्या ज्या बँकेत तुम्हाला व्याजदर कमी लागतील. 

वेळेवर कर्जाचा हप्ता भरावा | Pay the loan installment on time 

पर्सनल लोन कुठल्याही कारणासाठी घेतले जाते त्यामुळे त्यासाठी कोणतेही महत्त्वाचे कारण नसते. त्यामुळे कर्जाचा हप्ता विलंब न करता वेळेवर भरला जाईल यासाठी ग्राहकाने काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही या कर्जाचा हप्ता थकवला तर भविष्यात तुम्हाला पुन्हा कर्ज मिळण्यास तफावत येईल. त्यामुळे वेळेवर कर्जाचा हप्ता भरणे गरजेचे आहे. खरं तर, तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता चुकवला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअर वर होतो. हा क्रेडिट स्कोअर कमी झाला तर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळून मिळणे अवघड होऊन जाते. 

आवश्यक तेवढेच कर्ज घ्यावे | Take as much loan as you need

कधी कधी तुम्हाला वैयक्तिक कर्ज जास्त मिळते. म्हणजेच गरजेपेक्षा जास्त कर्ज मिळते. परंतु गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतल्यामुळे त्या कर्जाचा हप्ता देखील तितकाच मोठा येतो. परंतु कर्जाचा हप्ता भरणे कधीकधी शक्य होत नाही. त्यामुळे तुमचा कर्जाचा हप्ता थकतो. त्यामुळे सहजपणे कर्ज मिळत असले तरीही तुम्हाला आवश्यक तेवढेच आणि झेपेल तेवढेच कर्ज घ्यावे. 

कर्जाची रक्कम परत फेडण्यासाठीचा कालावधी  | Period for repaying the loan amount 

तसेच पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला किती कालावधीसाठी कर्ज घ्यायचे आहे हे लक्षात ठेवा. तसेच दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेणे घेतले, तर तुम्हाला येणारा महिन्याचा हप्ता कमी येईल. परंतु तुम्हाला या कर्जासाठी अधिक व्याजदर भरावे लागतील. याउलट जर पेमेंट कालावधी कमी ठेवला तर तुम्हाला ईएमआय नक्कीच जास्त येऊ शकतो. पण तुम्हाला यासाठी कमी व्याज द्यावे लागेल. अशा परिस्थितीत, तुमच्या गरजेनुसार वैयक्तिक कर्जाचा कालावधी तुमचा हप्ता भरण्याच्या सोयीनुसार आणि विचारपूर्वक निवडा.   

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

पर्सनल लोनसाठी योग्य पर्याय निवडावा  | Choose the right option for the personal loan 

सध्याच्या काळात बँक आणि एनडीएफसी कडून पर्सनल लोन मिळवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार या दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. मात्र तुम्हाला सावकाराची निवड करताना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी सावकाराकडून आकारले जाणारे व्याजदर किंवा प्रक्रिया शुल्क आणि सुविधा शुल्क तसेच इतर शुल्कांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  

Leave a comment